शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नायडूंच्या तटस्थतेची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:41 IST

राज्यसभेत सत्ताधारी पक्ष तसा अल्पमतात आहे. विरोधकांमधे बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे संतुलन सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी नवे उपराष्ट्रपती व सभापती व्यंकय्या नायडूंना पार पाडावी लागणार आहे.

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेत सत्ताधारी पक्ष तसा अल्पमतात आहे. विरोधकांमधे बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे संतुलन सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी नवे उपराष्ट्रपती व सभापती व्यंकय्या नायडूंना पार पाडावी लागणार आहे. हे करताना त्यांची एकप्रकारे कसोटीच असणार आहे.शुक्रवार (११ आॅगस्ट) हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कारकिर्दीचा १0 आॅगस्ट हा अखेरचा दिवस असल्याने शुक्रवारपासून नवे उपराष्ट्रपती नायडूंच्या राज्यसभेतील सभापती पदाच्या कारकिर्दीचा प्रारंभ होईल. राज्यसभेत भाजप प्रथमच सर्वात मोठया पक्षाच्या भूमिकेत आहे. मोदी सरकारच्या उर्वरित दिड वर्षाच्या कारकिर्दीत या सभागृहात अधिकाधिक विधेयके मंजूर व्हायला हवीत, अशी सरकारची अपेक्षा आहे. तुल्यबळ संख्येतल्या सत्ताधारी व विरोधकांमधे संतुलन सांभाळीत ही अवघड जबाबदारी मुख्यत्वे नायडूंनाच पार पाडायची आहे.उपराष्ट्रपती पदासह राज्यसभेचे सभापतीपद हमीद अन्सारींनी सलग दहा कौशल्याने सांभाळले. अनेक ताणतणावाचे प्रसंग राज्यसभेने या काळात अनुभवले मात्र कठीण प्रसंगातही सभागृहाचे संतुलन अन्सारींनी अत्यंत संयमाने हाताळले. काही लक्षवेधी प्रसंगात अन्सारींचे क्वचित काही निर्णय वादग्रस्तही ठरले. उदाहरणेच द्यायची तर ३0 डिसेंबर २0११ रोजी रात्री १२ वाजता सभागृहात लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू असतांना अन्सारींनी राज्यसभेचे कामकाज अचानक तहकूब केले. सत्ताधारी काँग्रेसला सांभाळण्यासाठीच हा निर्णय त्यांनी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर राजपथावरील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पहिल्या कार्यक्रमात हमीद अन्सारी उपस्थित नसल्याने भाजपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्यावर टीका केली मात्र सरकारतर्फे या कार्यक्रमाचे उपराष्ट्रपतींना निमंत्रणच पाठवण्यात आले नव्हते हे सत्य उघडकीला आल्यावर अन्सारींची माफी मागायची पाळी या प्रवक्त्यांवर आली.कौशल्य पणाला लावावे लागणारभारताच्या १३ व्या उपराष्ट्रपतिपदी निवड होण्याआधी व्यंकय्या नायडू मोदी सरकारमधे नगरविकास व माहिती प्रसारण खात्याचे मंत्री होते. सुरूवातीची दोन वर्षे संसदीय कामकाज मंत्र्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली मात्र आक्रमक आवेशात विरोधकांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन करण्याच्या उत्साहात काही प्रसंगात नायडूंनी वादही ओढवून घेतले.राज्यसभेचे सभापतीपद अत्यंत तटस्थतेने सांभाळावे लागते. विशेषत: सभागृहात सत्ताधारी पक्ष अल्पमतात असतांना वाद न होऊ देता सारे कौशल्य पणाला लावून या पदाची प्रतिष्ठा व जबाबदारी नायडूंना सांभाळावी लागेल.