शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडूंवर पक्षपाताचा आरोप; राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 03:18 IST

नवी दिल्ली : सभापती व्यंकय्या नायडू  मनमानी अन् पक्षपाती धोरणानुसार विरोधकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संसदेत व बाहेर लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. विरोधी सदस्यांना शक्यतो बोलूच द्यायचे नाही, असा सभापतींचा पवित्रा आहे. असे आरोप करीत काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, ‘आप’सह बहुतांश विरोधी पक्षांनी मंगळवारी राज्यसभेतून  सभात्याग केला. त्यामुळे कामकाज दिवसभर तहकूब झाले.

ठळक मुद्देकामकाज तहकूब

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सभापती व्यंकय्या नायडू  मनमानी अन् पक्षपाती धोरणानुसार विरोधकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संसदेत व बाहेर लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. विरोधी सदस्यांना शक्यतो बोलूच द्यायचे नाही, असा सभापतींचा पवित्रा आहे. असे आरोप करीत काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, ‘आप’सह बहुतांश विरोधी पक्षांनी मंगळवारी राज्यसभेतून  सभात्याग केला. त्यामुळे कामकाज दिवसभर तहकूब झाले.विरोधी खासदार बाहेर पडताच पत्रकारांना भेटले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले की, विविध राज्यांतील जनहिताचे मुद्दे मांडणे हे विरोधी खासदारांचे कामच आहे. काही मुद्दे इतके संवेदनशील असतात की त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा नोटीस देण्यापुरता वेळही नसतो. विषयाचे गांभीर्य लक्षात घेउन त्यावर  खासदारांना बोलू दिले जात होते. व्यंकय्या नायडू ही परंपरा पाळायला तयार नसून, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यावेळी म्हणाले की, सभापतींचा हाच पवित्रा कायम राहिला तर की पुढे काय करायचे, याचा निर्णय विरोधकांना घ्यावा लागेल. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन म्हणाले, सभागृहाच्या आत आणि बाहेर लोकशाहीचा गळा घोटण्याचाच हा प्रकार आहे आम्ही सारे विरोधक त्यामुळेच एकत्र आलो आहोत. आपचे संजयसिंग म्हणाले की, आज सभागृह सुरळीत सुरू होते. कोणीही सदस्य गोंधळ व गदारोळ करीत नव्हता. बोलण्यासाठी काही सदस्य जागांवर उभे राहून सभापतींची परवानगी मागत होते. त्यांना बोलण्याची संधी देऊ न सभापती शांतही करू शकले असते. मात्र त्यांनी ५ मिनिटात २ वाजेपर्यंत त्यांनी कामकाज तहकूब करून टाकले. 

लोकसभेत सत्ताधार्‍यांचा गोंधळराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलायला काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे उभे राहिले, तेव्हा भाजप व रालोआच्या आंध्रच्या सदारांनी दुसर्‍याच विषयावर गदारोळ माजवून खरगेंना बोलू दिले नाही. सत्ताधारी व विरोधकांची तडजोड झाल्यावर मात्र दुपारी खरगेंचे भाषण झाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू