शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सुधारित-महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेनेचा स्वबळाचा नारा?

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेनेचा स्वबळाचा नारा?

महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेनेचा स्वबळाचा नारा?
ेसंदीप प्रधान
नागपूर- महापालिकांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना यांच्यात जागावाटपावरून खडाखडी होणार असे संकेत आतापासून प्राप्त होऊ लागले आहेत. भाजपाला मुंबई, ठाणे महापालिकांसह सर्व महापालिकांत निम्म्या जागा भाजपाला सोडण्याचा आग्रह त्या पक्षाने शिवसेनेकडे धरलेला आहे. त्यामुळे अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत.
सर्वात प्रथम २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक होणार असून त्यानंतर २०१६ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ३३ तर भाजपाचे केवळ ९ सदस्य आहेत. १०७ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेतील ६२ जागा शिवसेनेने तर ४५ जागा भाजपानेे लढवल्या होत्या. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ७५ तर भाजपाचे ३२ सदस्य आहेत. २२७ सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेतील १३५ जागा शिवसेना तर ६३ जागा भाजपा लढली होती. रिपाइंला शिवसेनेने २९ जागा सोडल्या होत्या. आता या दोन महापालिकेत जरी भाजपाने निम्म्या जागांची मागणी केली तरी भाजपा-शिवसेनेत संघर्ष सुरु होऊ शकतो. मुंबई महापालिकेत निम्म्या जागा भाजपाने मागितल्या तर त्यांना ४३ जागा वाढवून द्याव्या लागतील. सध्या शिवसेना व भाजपा लढवत असलेल्या जागांमधील अंतर ७२ जागांचे आहे.
शिवसेनेचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करताना महापालिकांमध्ये निम्म्या जागा भाजपाला सोडण्याची हमी देण्याची अट घालण्याचा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र महापालिका जागांची चर्चा आता नको, असे सांगत शिवसेनेने त्याला विरोध केला होता. परंतु भाजपाने निम्म्या जागांचा मुद्दा सोडलेला नाही. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सर्व महापालिकांत युती अशक्य असल्याचे केलेले सूतोवाच हे त्याचेच द्योतक मानले जात आहे. राज्यातील २६ महापालिकांमध्ये सध्या भाजपाचे ३१५ सदस्य आहेत.
मुंबईकरिता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्याच्या मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला विरोध करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्पितळातून धाडण्यामागेही महापालिका निवडणुका कळीच्या ठरणार हे पवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्याचे निदर्शक आहे. नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महापालिका निवडणुकीकरिता कामाला लागण्याचा आदेश दिला आहे.