शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

नागापूर दरोड्यातील दोघांना जन्मठेप

By admin | Updated: July 16, 2015 00:05 IST

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नागापूर येथील दरोड्यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कचरू पवार व मनीषा पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना २००७ मध्ये घडली होती़ या दरोड्यातील आरोपी सुरेश व्यंकटी चव्हाण, विठ्ठल श्रीराम पवार या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नागापूर येथील दरोड्यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कचरू पवार व मनीषा पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना २००७ मध्ये घडली होती़ या दरोड्यातील आरोपी सुरेश व्यंकटी चव्हाण, विठ्ठल श्रीराम पवार या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की़, आरोपी चव्हाण व पवार यांनी भिक्षुकाच्या वेषात येऊन पवार यांच्या शेतातील घराची पाहणी केली़ यानंतर २४ एप्रिल २००७ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास सहकार्‍यांसह येऊन या घरावर दरोडा टाकला़ यामध्ये दरोडेखोरांनी कुर्‍हाड, कोयता, लाकडी दांडक्याने पवार कुटुंबीयांना केलेल्या जबर मारहाणीत कचरू पवार व मनीषा पवार यांचा मृत्यू झाला़ तर शरद पवार, प्रभावती पवार, प्रगती पवार यांना मारहाण करून घरातील ऐवज चोरून नेला होता़या प्रकरणी उत्तम पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती़ या गुन्‘ात काशीराम पवार याने तयार केलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचे हे कृत्य असल्याचे उघड झाले होते़ तसेच या टोळीने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अनेक ठिकाणी दरोड्याचे गुन्हे केले होते़ त्याच्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्कान्वये) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़नागापूर दरोड्याचा हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये विशेष सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी २७ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रभावती पवार, शरद पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली़ याप्रकरणी न्यायाधीश कदम यांनी आरोपी सुरेश व्यंकटी चव्हाण, विठ्ठल श्रीराम पवार या दोघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली़(प्रतिनिधी)