शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

नबी यूपी, तर कमलनाथ हरियाणा, पंजाबचे प्रभारी

By admin | Updated: June 14, 2016 04:28 IST

उत्तर प्रदेशात आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि हरियाणात राज्यसभा निवडणुकीमध्ये फुटलेली आमदारांची मते या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि हरियाणात राज्यसभा निवडणुकीमध्ये फुटलेली आमदारांची मते या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही राज्यांची जबाबदारी आता अनुक्रमे गुलाब नबी आझाद आणि कमलनाथ यांच्याकडे सोपवली आहे. गुलाब नबी आझाद हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, तर कमलनाथ हे सतत नऊ वेळा मध्य प्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले आहेत. हे दोन्ही नेते गांधी परिवाराचेही कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.कमलनाथ यांच्याकडे हरियाणाबरोबरच पंजाबचीही सूत्रे देण्यात आली आहेत. त्या राज्यातही पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, तिथे काँग्रेसला विजयाची शक्यता वाटत आहे. काँग्रेसने या दोन राज्यांतील पक्षाची रणनीती ठरवण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवले असून, त्यांच्या सल्ल्यानेच दोन्ही नेत्यांकडे वरील राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येते. पंजाबमध्ये अकाली दल-भाजपा सरकार असून, त्या सरकारविषयी लोकांमध्ये रागाचे वातावरण आहे. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस व आम आदमी पार्टी करीत आहेत. त्यामुळे या दोन पक्षांतच सामना होईल, अशीही चर्चा सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)भाजपाला काँग्रेसची भीती, त्यामुळेच खटले सुरू केलेकाँग्रेसची पंजाबमधील रणनीती लक्षात घेत, त्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी केंद्र सरकारने १९८४ सालच्या शीख दंगलीतील खटले पुन्हा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दंगलीत कमलनाथ यांच्यासह अनेक नेत्यांची नावे घेतली गेली होती. मात्र, दंगलींची चौकशी करणाऱ्या नानावटी आयोगाने आपणास निर्दोष म्हणून जाहीर केले आहे. त्या दंगलीत आपणास अडकवण्याचा काहींनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे दंगलींचे खटले पुन्हा सुरू केले, तरी त्यास आपण घाबरत नाही, असे कमलनाथ यांनी सांगितले. अकाली दल आणि भाजपाला काँग्रेसची भीती वाटत असल्यामुळेच, पुन्हा खटले सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याची टीकाही त्यांनी केली.यूपीत उपयोगगुलाब नबी आझाद हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, उत्तर प्रदेशातील मुस्लीमबहुल मतदारसंघ पाहता, त्यांचा उपयोग करून घेण्याचे पक्षाने ठरविले आहे, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.