शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत ११ अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

By admin | Updated: October 9, 2015 05:14 IST

देशात सन २००९ ते २०१३ या चार वर्षांच्या काळात ११ अणू शास्त्रज्ञांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती अणुऊर्जा विभागाच्या ताज्या

नवी दिल्ली : देशात सन २००९ ते २०१३ या चार वर्षांच्या काळात ११ अणू शास्त्रज्ञांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती अणुऊर्जा विभागाच्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे.विभागाच्या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात कार्यरत आठ शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा स्फोटात, समुद्रात बुडून वा गळफास लावून मृत्यू झाला. हरियाणाचे रहिवासी राहुल सेहरावत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याबाबत माहिती मागितली होती. राहुल यांच्या अर्जाच्या उत्तरादाखल अणुऊर्जा विभागाने उपरोक्त माहिती दिली आहे. अणुऊर्जा मंडळाच्या तीन अधिकाऱ्यांचाही याकाळात संशयास्पद मृत्यू झाला. यापैकी दोघांनी कथितरीत्या आत्महत्या केली होती तर अन्य एकाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.बार्क, ट्रॉम्बेच्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत सन २०१० मध्ये दोन संशोधन सहकाऱ्यांचा रहस्यमय स्थितीत लागलेल्या आगीत मृत्यू झाला होता. एफ श्रेणीच्या एका शास्त्रज्ञाची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपीचा छडा लागू शकलेला नाही. आरआरसीएटीच्या ड श्रेणीच्या एका शास्त्रज्ञानेही कथितरीत्या आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणाची फाईलही पोलिसांनी बंद केली. कल्पकममध्ये कार्यकत आणखी एका शास्त्रज्ञाने २०१३ मध्ये कथितरीत्या समुद्रात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली होती. मुंबईतील एका अन्य शास्त्रज्ञानेही कथितरीत्या गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. आणखी एका शास्त्रज्ञाने कथितरीत्या कर्नाटकच्या कारवारमध्ये काली नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. वैयक्तिक कारणांतून ही आत्महत्या झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. (प्रतिनिधी)- बार्क, ट्रॉम्बेमध्ये कार्यरत क-श्रेणीच्या दोन शास्त्रज्ञांचे मृतदेह २०१० मध्ये त्यांच्या निवासस्थानी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले होते. तर रावतभाटामध्ये याच गटाचा अन्य एक शास्त्रज्ञ २०१२ मध्ये त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आला होता. बार्कच्या एका प्रकरणात दीर्घ आजारामुळे शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी हे प्रकरण बंद केले. तर अन्य प्रकरणांचा अद्यापही तपास सुरूआहे.