शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माझा मुलगा देशद्रोही नाही, हिंदुत्वविरोधी आहे

By admin | Updated: February 14, 2016 15:06 IST

माझा मुलगा देश विरोधी नाही. फक्त तो हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करतो म्हणून त्याला लक्ष्य केले जात आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १४ - माझा मुलगा देश विरोधी नाही. फक्त तो हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करतो म्हणून त्याला लक्ष्य केले जात आहे. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे ? अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरु विद्यापाठीतील देश विरोधी घोषणां प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्हया कुमारचे पिता जयशंकर सिंह यांनी दिली. 
 
देशद्रोहाच्या आरोपाखाली कन्हय्या कुमारला शुक्रवारी अटक करण्यात आली. तो जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. माझ्या मुलाचा लहानपणापासून राजकारणाकडे ओढा आहे पण त्याने कधीही देश विरोधी वक्तव्य केलेले नाही असे कन्हय्याची आई मीणा देवी यांनी सांगितले. 
 
कन्हय्याचे कुटुंब बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील मसलनपूर-बिहाट या गावी रहाते. छोटे शेतकरी असलेल्या जयशंकर सिंह यांना दोन वर्षांपूर्वी पक्षघाताचा झटका आला. तेव्हापासून ते बिछान्याला खिळून आहेत. मीणा देवी या अंगणवाडी सेविका असून, महिन्याला त्यांना चार हजार रुपये वेतन मिळते. 
 
सीपीआय नेते डी.राजा यांनी शनिवारी मला फोन करुन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर झालेल्या पक्षाच्या नेत्यांच्या  भेटीची माहिती दिली असे जयशंकर सिंह यांनी सांगितले.