शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: सर्जिकल स्ट्राइकविषयी माझा प्रश्न सैन्याबद्दल नव्हताच : दिग्विजय सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:30 IST

न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

सर्जिकल स्ट्राइकवेळी मी उपस्थित केलेले प्रश्न सैन्याबद्दल नव्हते तर भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या तथ्यहीन वक्तव्यांवर होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे नेमके किती सैनिक मारले, हा तो प्रश्न होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी हात वर केले तरी काँग्रेसने कधी मला नोटीस दिली नव्हती, असे स्पष्टीकरण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. मध्य प्रदेशची आगामी निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल, असे दिग्विजय सिंह यांनी ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना सांगितले. 

न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दिग्विजय सिंह म्हणाले की, आपण नेहमीच पक्षाच्या आदेशाचे पालन केले आहे. कधीही पक्षविरोधी राहिलो नाही व कोणत्याही वक्तव्यावर मला कधीही पक्षाने नोटीस दिलेली नाही. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी कर्तव्य म्हणून फॉर्म मागे घेतला होता. मध्य प्रदेशात माझ्या नावाने विविध तथ्यहीन दावे करण्यात येतात. आपण मुख्यमंत्री राहिलो असलो तरी पुढील निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वात लढू. 

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात लोकशाहीची अक्षरश: हत्या सुरू आहे. राहुल गांधींचे संसदेतील भाषण रेकॉर्डवरून उडविले गेले. ते विदेशात लोकशाहीच्या मर्यादेत राहूनच बोलले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करताना दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, संघ ही नोंदणीकृत संस्था नाही. एकीकडे भारतीय राज्यघटनेबद्दल बोलतात तर दुसरीकडे हिंदू राष्ट्राची भाषा करतात. नेपाळमध्ये ९५ टक्के लोक हिंदू असूनही ते राष्ट्र हिंदू नाही. इस्लामिक पाकिस्तानची दुर्दशा सर्व जग पाहत आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याने येथे हिंदू राष्ट्राची संकल्पना शक्य नाही आणि तसा विचार देशहिताचा नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड