शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

माझे जीवन खुले पुस्तक -दिग्विजयसिंह

By admin | Updated: October 4, 2014 08:23 IST

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री, खासदार व काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव दिग्विजयसिंह यांची प्रकट मुलाखत सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

भोपाळस्थित लोकमत भवनाच्या लोकार्पण समारंभात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री, खासदार व काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव दिग्विजयसिंह यांची प्रकट मुलाखत सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. भोपाळमधील हा एक आगळावेगळा प्रयोग ठरला़ शहरात प्रिंट मीडियाच्या कुठल्या कार्यक्रमात यापूर्वी कधी अशी प्रकट मुलाखत झालेली नव्हती. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र यांनी काही फारच औत्सुक्याचे प्रश्न विचारले आणि उभय पाहुण्यांनी तेवढय़ाच आवडीने त्यांची उत्तरेही दिलीत. यापैकी दिग्विजयसिंह यांच्या प्रकट मुलाखतीचा संपादित अंश.
 
’ तुमचे हास्य मोनालिसाशी मिळतेजुळते असल्याचे लोकांचे म्हणणो आहे. फारच रहस्यमय.
- आपण माझी तुलना मोनालिसाशी केली आहे. मोनालिसाचे हास्य रहस्यमय आहे. परंतु माङो अजिबातच नाही. जे आहे ते सर्वासमक्ष आहे. त्यात कुठलेही रहस्य नाही.
’ सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हास्य मावळत चालले आह़े आपणास मी अनेकदा खळखळून हसताना पाहिल़े हे कसे शक्य आहे?
- अहो, हसणो आरोग्यासाठी चांगले असते, हे आता डॉक्टरही सांगतात़ ही एक प्रकारची थेरपी आहे, उपचार आहेत़ यामुळे आजार लांब पळतात़ माङया मते, हास्य गरजेचे आह़े स्वस्थ राहायचे तर हसत राहाव़े
’ मी ऐकले की, आपण योग निद्रेत पारंगत आहात?
- मी गत 3क्-35 वर्षापासून योग करीत आह़े ध्यान-प्राणायाम करीत आह़े याचे अनेक लाभ आहेत़ ध्यान-प्राणायाम तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत करत़े यामुळे काम करण्यास अधिक वेळ मिळतो़
’ आपण झोपता कमी तर मग स्वप्ने कधी बघता? दिग्विजयसिंह काय डोळे उघडे ठेवून स्वपAे बघू लागले आहेत?
- प्रत्यक्षात स्वप्न तर तेच आहे, जे जागे राहून बघितले जात़े डॉ़ एपीजे अब्दुल कलाम यांनीही म्हटले आहे की, जी तुम्हाला झोपू देत नाहीत, तीच स्वप्ने आहेत़ देशाच्या विकासासाठी, समाज विकासासाठी स्वप्ने बघणो गरजेचे आह़े
’ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आपण प्रचंड लोकप्रिय होतात़ वैद्यकीय महाविद्यालयातही आपली लोकप्रियता खूप होती़
- मी क्रिकेट खेळायचो़ इतर खेळांतही माझा सहभाग असायचा़ त्यामुळे साहजिकच लोकप्रिय होता़ मेडिकल कॅालेजमध्ये माङो खूप मित्र होत़े त्यामुळे मी लोकप्रिय होतो़़
’ आपण मुख्यमंत्री असताना दरोडेखोरही आपले नाव ऐकून पळून जायचे, असे ऐकलेय़ एखादा प्रसंग सांगता येईल़
- मुख्यमंत्री असताना मी ग्राम संपर्क अभियानात जात होतो़ एकदा बालाघाट भागातील सोनागिरी गावात गेला़े मंदिराजवळ आमची बैठक सुरूहोती़ जवळच आमदार कंकर मुंजारे होत़े संध्याकाळी कंकर मुंजारेंचा मला फोन आला़ आपण गावात असताना तेथे आठ नक्षलवादी हजर होत़े तुमच्या बैठकीलाही ते हजर होते, असे त्यांनी मला सांगितल़े मी सुरक्षेविना गावांत जातो, याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली़आम्ही गावखेडय़ात अनेकदा फिरतो़ मुख्यमंत्री शिवराजसिंहही फिरतात़ आजकाल सुरक्षा घेणो प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आह़े मी सांगू इच्छितो की, केंद्रात भाजपाचे सरकार असताना लालकृष्ण आडवाणींचे एक पत्र मला मिळाल़े आपणास ङोड प्लस सुरक्षा देण्यात येत असल्याचे त्यात लिहिलेले होत़े मी त्यांना पुन्हा पत्र लिहिल़े मला ही सुरक्षा देत नसाल तर बरे होईल, असे मी त्यांना म्हटल़े सुरक्षेने काय होत़े सर्वाधिक सुरक्षेच्या गराडय़ात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या झाली़ इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली़ मारेक:याला कुणीही रोखू शकत नाही, असे माङो मत आह़े
’ आपण आपल्या मनातल्या भावना कुणाकडे व्यक्त करता? कुणी मित्र वा कुणी अतिशय निकटचे असे?
-  मी माङया मनातल्या सगळ्या गोष्टी सर्वाशी शेअर करतो़ जगाला माहिती नाही, असे माङया आयुष्यात काहीही नाही़ माङो जीवन खुले पुस्तक आह़े यात लपवण्यासारखे काहीही नाही़
’ आपण मुख्यमंत्री असताना आपल्याकडे कुठलाही विभाग नव्हता़ चीफ मिनिस्टर विदाऊट पोर्टफोलियो होत़े याउपरही आपण विधानसभेत सीएम अवर ठेवायच़े आमदार आपणास प्रश्न विचारू शकत होत़े
-  मुख्यमंत्र्याकडे कुठलेही पोर्टफोलियो असण्याची गरज नाही़ त्यामुळेच अनेक प्रयत्न होऊनही माङयाविरुद्ध काहीही मिळू शकले नाही़ माङयाकडे कुठलेही खाते नव्हत़े पीसी शर्मा (भोपाळ डेव्हलपमेंट अॅथारिटीचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार) येथे हजर आहेत़ ते लंडनला गेले होत़े तेथील संसदेचे कामकाज बघून आले आणि त्यांनीच ही कल्पना मांडली़ आपल्याला थेट प्रश्न विचारण्याची संधी असायला हवी, हे मला पटले आणि मी अध्र्या तासाचा प्रश्नोत्तराचा तास ठेवला़ यावेळी मला कुठल्याही नोटीसविना धोरणात्मक प्रश्न विचारू शकत होत़े मात्र खासगी नाही़ मी सुरुवात केली आणि चांगले परिणाम आल़े चांगले प्रश्न विचारले जायच़े मी मुख्यमंत्र्यांना आग्रह करेन की, त्यांनी पुन्हा हा उपक्रम सुरू करावा़ यामुळे लोकांना म्हणणो मांडायची संधी मिळेल़ काँग्रेस आमदार त्रस देतील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी़ पण द्यावी़
’ सध्या वारसा सोपवण्याचा काळ सुरू आह़े प्रत्येक नेता आपल्या मुलांना आपला वारसा सोपवत आह़े आपली योजना काय?
- मी माङया मुलाला राजकारणात येऊ नकोस असा सल्ला दिला होता़(कार्यक्रमात दिग्विजयसिंह यांचे चिरंजीव आणि आमदार जयवर्धनसिंह हेही हजर होते) कठीण काम आह़े सर्वात आधी आपले कुटुंबच लक्ष्य ठरत़े शिवराजसिंह येथे आहेत़ आमच्या सूनबाई त्यांची काळजी घेतात़ पण ते स्वत: मुलांची किती काळजी घेऊ शकत असतील, हे मला ठाऊक नाही़ दुस:यांच्या समस्या सोडवण्यात राजकारण्यांचा इतका वेळ जातो की, स्वत:च्या कुटुंबांच्या, मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नसतो़
’ आपण धार्मिक नेत्यांवर प्रचंड टीका करताना दिसता पण खासगी आयुष्यात आपण प्रचंड धार्मिक आहात़ आपल्या गडात अनेक मंदिरे आहेत़
- त्याचे असे आहे की, माझी आई अत्यंत धार्मिक होती़ तेच संस्कार आम्हाला मिळाल़े सर्वधर्मसमभाव ही आपल्या धर्माची शिकवण आह़े हेच ध्यानात घेऊन मी माङो काम करीत आह़े पण मीडियाबद्दल मला तक्रार आह़े जेव्हा मी मुस्लीम फंडामेंटलिझमबाबत बोलतो, तेव्हा ते कुणीही छापत नाही़ पण हिंदू फंडामेंटलिझमविरुद्ध बोलतो तेव्हा ते सर्व छापतात़ ओसामा बिन लादेनला ठार मारल्यानंतर एक पत्रपरिषद होती़ मला प्रश्न विचारला गेला आणि मी म्हणालो की,  कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेनला ठार मारले याबाबत मी अमेरिकेचे अभिनंदन करतो़ पण मला एकच आश्चर्य वाटते की, पाकिस्तानच्या लष्करी अधिकार क्षेत्रपासून केवळ काही मीटर अंतरावर ‘ओसामाजी’ राहात होते आणि पाकिस्तानला ठाऊक नव्हते? दुस:या दिवशी मी ओसामाला ओसामाजी म्हटल्याची बातमी सगळीकडे उमटली़ खरे तर मी उपरोधिकपणो हे बोललो होतो़ पण कुणीच समजू शकले नाही़ 
’ मीडियाचे लोक खासगी आयुष्यात डोकावतात, तेव्हा वाईट वाटते का?
- मला काहीही आक्षेप नाही़ माङो जीवन खुले पुस्तक आह़े यामुळे मला काहीही लपविण्याची गरज नाही़
’ सर्वाधिक कुठली अभिनेत्री आवडते?
- जी सर्वाधिक आवडायची ती निघून गेली.