शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरे कान पक गये है’!

By admin | Updated: January 28, 2016 02:05 IST

जकात आणि अबकारी शुल्क विभागाशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वित्त मंत्रालयाशी संलग्न

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

जकात आणि अबकारी शुल्क विभागाशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वित्त मंत्रालयाशी संलग्न असलेल्या या दोन्ही विभागांबाबतच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी उच्चस्तरीय निगराणी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले असल्याची माहिती आहे.पंतप्रधान मोदी हे बुधवारी दिवसभर आर्थिक कामकाजावरील मंत्रिमंडळ समिती आणि मंत्रिमंडळ व विविध योजनांशी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात व्यस्त होते. सरकारचे कुठे आणि काय चुकते आहे, हे जाणून घेणे आणि सरकारची प्रतिमा उजळण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन करणे हा या मंत्रिस्तरीय संवादाचा उद्देश होता.मोदी यांनी आपल्या कार्यालयात मोठ्या संख्येने प्राप्त होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत, ही समस्या निर्माण होण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. ‘मेरे कान पक गये है,’ असे पंतप्रधान मोदी वित्त मंत्रालयाच्या तीन सचिवांसह अन्य मंत्रालयांच्या वरिष्ठ सचिवांना उद्देशून म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कडक निगराणी यंत्रणेच्या माध्यमातून या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश मोदींनी या विभागांच्या सचिवांना दिले.दादरी येथील अखलाक हत्याकांड, हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्येसह अन्य काही घटना आणि सरकार तसेच भाजपातील वाचाळवीरांमुळे तसेही मोदी फार चिंतित आहेत. त्यांनी बुधवारी आपल्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या अनौपचारिक बैठकीत अतिशय जोशपूर्ण असे भाषण केले. परंतु ‘प्रगती’ (प्रो-अ‍ॅक्टिव्ह गव्हर्नन्स अ‍ॅण्ड टाईमली इम्प्लिमेंटेशन) च्या ९ व्या बैठकीत बोलताना मात्र त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जबर धक्का दिला. ‘माझ्याकडे लोकांकडून अनेक तक्रारी मिळत आहेत आणि हे मी सहन करणार नाही,’ असे मोदी म्हणाले.अनेक योजनांची समीक्षाअधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी रस्ते, रेल्वे, कोळसा, ऊर्जा आणि अक्षय न नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रासह इतरही अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीची समीक्षा केली. ज्या प्रकल्पांच्या प्रगतीची मोदींनी समीक्षा केली, त्यात मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर आणि अलाहाबाद ते हल्दिया दरम्यानच्या जलमार्ग विकास प्रकल्पाचा समावेश आहे. त्यासोबतच मोदींनी उज्ज्वल डिस्कॉम अ‍ॅश्युरंस योजनेची (उदय) प्रगती आणि नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीचीही समीक्षा केली.