शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

युती तोडली म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या

By admin | Updated: November 1, 2015 00:26 IST

जळगाव- युती तुटली नसती तर भाजपाचा मुख्यमंत्री झाला नसता. युती तोडल्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्यानंतर तो निरोप पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. युती तोडल्याचा निरोप फक्त मी शिवसेनेला दिला. म्हणून शिवसेनेला नाथाभाऊ दिसतो. पण शिवसेने गद्दारी केली. जळगाव जिल्ह्याने ती अनुभवली. यामुळे आपला पुत्र निखील खडसे पराभूत झाला. आमच्या मोठ्या भावाचे (शिवसेनेचे) मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या, अशी आगपाखड महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी भाजपातर्फे सरकारच्या वर्षपूर्तर्ीनिमित्त आयोजित जाहीर सभेत केली.

जळगाव- युती तुटली नसती तर भाजपाचा मुख्यमंत्री झाला नसता. युती तोडल्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्यानंतर तो निरोप पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. युती तोडल्याचा निरोप फक्त मी शिवसेनेला दिला. म्हणून शिवसेनेला नाथाभाऊ दिसतो. पण शिवसेने गद्दारी केली. जळगाव जिल्ह्याने ती अनुभवली. यामुळे आपला पुत्र निखील खडसे पराभूत झाला. आमच्या मोठ्या भावाचे (शिवसेनेचे) मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले म्हणून माझ्या ७०० पिढ्या काढल्या, अशी आगपाखड महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी भाजपातर्फे सरकारच्या वर्षपूर्तर्ीनिमित्त आयोजित जाहीर सभेत केली.
शहरात सुभाष चौकात रात्री ही सभा झाली. व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी, प्रवक्ते माधव भंडारी, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन, विधान परिषद आमदार स्मिता वाघ, गुरूमुख जगवानी, जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे, गजानन जोशी, राजेंद्र फडके आदी उपस्थित होते.
भाजपाचे एकट्याच्या बळावर सरकार
युती तुटली म्हणून राज्यात इतिहासात प्रथमच भाजपाचे सरकार आले. शपथविधीनंतर शिवसेना सोबत आली. पण युतीत जे मोठा भाऊ म्हणून आम्हाला हिणवत होते ते लहान भाऊ झाले. युती तुटली नसती तर मोठ्या भावाकडेच मुख्यमंत्रीपद राहीले असते, असेही खडसे म्हणाले.

आपच्या प्रीती आल्या, त्यांनी माझे नाव घेतले
इकडे आपच्या प्रीती आल्या होत्या. त्यांनी माझे नाव घेतले. आपले नाव मोठे करण्यासाठी कुणीही माझे नाव कुठेही जोडते, अशी टिका खडसेंनी केली.

वृत्तपत्र माझे नाव छापून टीआरपी वाढवताहेत
अनेक वृत्तपत्रांना नाथाभाऊ दिसतो. आपला टीआरपी वाढविण्यासाठी ते माझ्यावर लेख छापतात. नाथाभाऊच्या नावाशिवाय वृत्तपत्रांचा टिआरपी वाढत नाही. त्यांना मी आवडतो. अधून मधून आठ-१५ दिवस ते माझे नाव घेत राहतात. पण कुणी कितीही उलटे, सुलटे लेख छापले, तरी मी निवडून येईलच, असेही खडसे म्हणाले.

उपस्थितांमधून कापसावर बोलण्याची मागणी
खडसे आपले भाषण करीत असताना उपस्थितांमध्ये असलेल्या एका व्यक्तीने कापसाचे काय, असे जोरात ओरडत विचारले. त्यानंतर खडसे कापसाच्या मुद्द्यावर आले. सध्या कापसाला ४५०० भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती सुधारत आहे. आम्ही कापसाच्या बियाण्याचे दर कमी केले. पेट्रोलचा दर लीटरमागे २० रुपयांनी कमी केला. रेल्वे भाडेवाढ केली नाही, शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्नकेला,असेहीखडसेम्हणाले.