नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीनबद्दलच्या नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसने रविवारी सडकून टीका केली़ मुत्सद्देगिरी ही ‘टेक अवे ज्वाइंट’ सारखी नसते़ जिथे सर्व काही तयार मिळेल, असे काँग्रेसने म्हटले़ अमेरिकेसोबत राजनैतिक संबंध बनविण्यापूर्वी मोदींनी देशाला विश्वासात घ्यायला हवे, असेही काँग्रेसने म्हटले़मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत कुठलाही अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल़ पण तूर्तास त्यांना चांगले गुण देता येणार नाहीत, असे काँग्रेस प्रवक्ते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले़ आपण काही म्हणू आणि पाकिस्तान ते मानेल, असे मोदींना वाटते़ पण मुत्सद्देगिरी अशी काम करीत नाही़, असे ते म्हणाले़ नवी दिल्लीत पाक उच्चायुक्त काश्मिरी फुटीरवादी नेत्यांना भेटणार होते़ यामुळे भारताने पाकिस्तानसोबतची परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली़ मोदींच्या या इशाऱ्याउपरही पाक उच्चायुक्त फुटीरवाद्यांना भेटले़ पाकिस्तान असेच वागणार, हे मोदी सरकारला कळायला हवे होते़ ते त्यांना कळत नसेल तर ते आश्चर्य आहे, याकडेही खुर्शीद यांनी लक्ष वेधले़ आपल्याला सर्व ‘टेक अवे ज्वाइंट’प्रमाणे मिळेल, असे मोदींना वाटते़ पण मुत्सद्देगिरीत असे होत नाही़ मी भारतात निवडणूक जिंकली म्हणून जगातील सगळ्यांना जिंकून घेईल, असा विचार चुकीचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुत्सद्देगिरी इतकी सोपी नाही; काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल
By admin | Updated: September 22, 2014 03:26 IST