शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मस्ट : एमपीटी पोर्टचा विस्तार लोकांसाठी धोकादायक

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

जुझे फि लिप डिसोझा : तीव्र आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इशारा

जुझे फि लिप डिसोझा : तीव्र आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इशारा
वास्को : वास्को-खारीवाडा येथे ड्रॅजिंग करून एमपीटीने पोर्टचे विस्तारीकरण करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रयत्न चालू केला आहे, तो मागे घ्यावा. अन्यथा, जनआंदोलनास तयार राहा, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जुझे फि लिप डिसोझा यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला़
फि लिप डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपीटीने खारीवाडा येथे विस्तारीकरणाच्या नावाखाली पीपीपीद्वारे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) ड्रॅजिंग चालू करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो खारीवाडा तसेच इतर वास्को शहरापासून इतर भागातील लोकांना घातक आहे. त्यामुळे खारीवाडा येथील घरे या ड्रॅजिंगमुळे वाहून जाऊन लोक बेघर होणार तसेच येथील मच्छीमारांवर उघड्यावर पडण्याची वेळ येणार; कारण सध्या खारीवाडा येथे समुद्री खोलाई 14 मीटर असून एमपीटीकडून ही खोलाई 5 ते 6 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न होत आह़े जर ही खोलाई वाढविली तर यापासून खारीवाडा येथील घरांना तसेच हार्बर, सडा, वास्को शहर भागाला ही धोक्याची घंटा असेल.
डिसोझा म्हणाले, एमपीटीचा हा प्रयत्न हाणून पाडण्यास आपण मागे-पुढे पाहणार नाही. संपूर्ण परिसर वाहून जाण्याची भीती आहे. याविषयी जनजागृती करून याविरुध्द आवाज उठविणार आहे.
बायणा ते दोनापावला फे री सेवा चालू करण्याचा जो प्रयत्न एमपीटीने केला तो लोकांच्या हिताचा नाही. जर ही फे री सेवा सुरू झाली तर बायणा समुद्रकिनार्‍याचे सौंदर्य नष्ट होईल. तसेच पूर्वी हार्बर ते दोनापावला ही फे री सेवा 20 ते 25 मिनिटांची होती़ ती आता दोन ते अडीच तासांची होणाऱ तसेच यात इंधन खर्चही वाढणाऱ तसेच या लांब पल्ल्याच्या प्रवासात समुद्रात एखादी वादळी वार्‍याची वैगेरे घटना घडली तर ते प्रवाशांना धोकादायक ठरेल.तसेच हा संपूर्ण बायणा समुद्री प?ा एमपीटीच्या घशात जाणार असून लोक येथील समुद्री सौंदर्यापासून वंचित राहणार आहेत, असे डिसोझा म्हणाले.

पत्रकार परिषदेत नगरसेविका नॅनी डिसोझा, प्रशांत लोटलीकर, अँड़ अशोक नाईक, नगरसेवक पाश्कोल डिसोझा आदी उपस्थित होत़े
(वार्ताहर)
स्थानिक आमदार, मंत्री
करतात खिसे भरण्याचे काम
याविषयी स्थानिक आमदार तसेच मंत्री काहीच करत नाहीत. त्यांनी या एमपीटीच्या कामाला चालना देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केल्याचा घणाघाती आरोप जुझे फि लिप डिसोझा यांनी या वेळी केला़ स्थानिक आमदार, मंत्री तसेच नगरसेवक जे बोर्ड ऑफ ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत, तेही काहीही करत नसल्याचे ते म्हणाले. अदानीसारख्या कंपनीकडून या सर्वांचे खिसे भरत असल्याचे त्यांनी सांगितल़े स्थानिक आमदार व मंत्री यांना लोकांच्या हिताचे काहीएक पडले नाही. ते एमपीटी तसेच अदानी कंपनीचे कटपुतळी बाहुले झाल्याचे डिसोझा यांनी सांगितल़े

फ ोटो आहे : 0309 वीएएस 09
ओळी :पत्रकार परिषदेत दरम्यान माहिती देताना जुझे फि लिप डिसोझा. बाजूला नॅनी डिसोझा, प्रशांत लोटलीकर व इतऱ
छाया : शेखर कळंगुटकर