शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील मुस्लिम अल कायदा संपवतील - मोदींना विश्वास

By admin | Updated: September 30, 2014 11:01 IST

भारतातील मुस्लीम समाज अल कायदाचा दहशतवाद कधीही यशस्वी होवू देणार नाही असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. ३० - भारताविरोधात लढण्याची घोषणा करणा-या अल कायदा या दहशतवादी संघटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले आहे. भारतातील मुस्लीम समाज अल कायदाचा दहशतवाद कधीही यशस्वी होवू देणार नाहीत,   असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. काऊंसिल फॉरेन रिलेशनला (सीएफआर) संबोधित करताना त्यांनी भारतीय मुस्लिम अल कायदाचा हा दहशतवाद संपवतील, असे सांगितले. यावेळी त्यांनी दहशतवाद, सीमावाद यासारख्या विविध विषयांवरील प्रश्नांनार उत्तरे दिली. 
दहशवाद हा फक्त दहशतवाद असतो, त्यात चांगले किंवा वाईट असे काहीही नसते. सर्व देशांनी धर्म, जात विसरून मानवतेच्या आधारावर एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा दिला पाहिजे, असे ते म्हणाले. 
भारतीय भूमी ही बुद्ध, महात्मा गांधी यांची आहे, त्यामुळे भारतातील नागरिक कधीच दहशतवादी संघटनांना साथ देणार नाहीत, असे ते म्हणाले. देशातील मुस्लीम समाजावर देशाचा पूर्ण विश्वास आहे, अल कायदाचा हा दहशतवाद भारतातील मुस्लिम समाज कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
यापूर्वीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही मोदींनी अल कायदाला सडेतोड उत्तर दिले होते. भारतातील मुस्लिम देशासाठी जगतील आणि प्रसंगी देशासाठी बलिदानही देतील, असा विश्वास त्यांनी त्या मुलाखतीत व्यक्त केला होता.