शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाकड व वृद्ध गायींसाठी राजस्थानमध्ये मुस्लिमांची गोशाळा

By admin | Updated: March 7, 2016 23:18 IST

गोहत्येवरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जयपूर येथील मुस्लिम एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेयर सोसायटीने गायींची देखभाल करण्याचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

जयपूर : गोहत्येवरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जयपूर येथील मुस्लिम एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेयर सोसायटीने गायींची देखभाल करण्याचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या सोसायटीने बिकानेर मार्गावर आदर्श मुस्लिम गोशाळा स्थापन करून भाकड, वृद्ध आणि आजारी गायींची काळजी घेण्याचे काम हाती घेतले आहे.ही गोशाळा या विभागातील सर्वांत मोठी आणि जोधपूरच्या मुस्लिम एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेयर सोसायटीद्वारे संचालित केली जाणारी एकमेव गोशाळा आहे. या गोशाळेत २०० च्यावर गायी आहेत. येथे पशुवैद्यकांच्या पथकातर्फे या गायींची काळजी घेती जाते. शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारी ही गोशाळा मागील आठ वर्षांपासून चालत आहे. ‘गायींची काळजी घेणे म्हणजे आईची काळजी घेण्यासारखे आहे. गोपालन हा भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचाही एक भाग आहे,’ असे सोसायटीचे सरचिटणीस आणि शिक्षणतज्ज्ञ हाजी मोहम्मद आतिक म्हणाले.आतिक हे दररोज दुपारची नमाज अदा केल्यानंतर आपल्या कारने गोशाळेत येतात आणि गायींची सेवा करतात. या गायींसाठी दररोज जोधपूरच्या लुनी तालुक्यातील बाजारातून ताजा चारा ट्रकने आणला जातो. (वृत्तसंस्था)संपूर्ण शहरामधून भाकड, वृद्ध आणि आजारी गायी गोशाळा पथकातर्फे येथे विशेष वाहनांमधून आणण्यात येतात. बहुतांश गायी या त्यांच्या मालकांनी त्या भाकड, वृद्ध वा आजारी झाल्यामुळे बेवारस सोडून दिलेल्याच असतात. ‘शहरांत राहणारे आमचे सदस्य अशा मोकाट सोडण्यात आलेल्या व बेवारस गायींवर लक्ष ठेवतात आणि त्यांना गोशाळेत आणतात. येथे या गायींची पूर्ण काळजी घेण्यात येते,’ असे मोहंमद आतिक म्हणाले. आतिक आणि त्यांचे सहकारी या गायींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात.