शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिला त्रस्त- नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 16, 2017 18:07 IST

ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिलांना त्रास सहन करावा लागतोय, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे.

ऑनलाइन लोकमत

भुवनेश्वर, दि. 16 - ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिलांना त्रास सहन करावा लागतोय. आपण त्यावर उपाय शोधले पाहिजेत, यासाठी जिल्हास्तरावर काम करण्याची गरज असल्याचंही मतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना ते ओडिशामध्ये बोलत होते. मोदींनी स्वपक्षीय नेत्यांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देताना विरोध पक्षांवरही हल्लाबोल केला आहे. तसेच ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि भाजपा मुस्लिम महिलांसोबत असल्याचं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. तर दुसरीकडे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं ट्रिपल तलाकमध्ये कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच विनाकारण ट्रिपल तलाक देणा-या व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असंही बोर्डानं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देशात असहिष्णुता वाढल्याचं कारण देत पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिक आता कुठे आहेत. विरोधक प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एक नवा मुद्दा उखरून काढत असतो. बिहार निवडणुकांच्या आधी पुरस्कार परत करण्यात आले होते. सध्या पुरस्कार परत करणारे कुठे आहेत ?, त्यानंतर दिल्लीत चर्चवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचा मुद्दा उचलला जातोय. मला वाटतं विरोधकांकडे नवे मुद्दे जन्माला घालण्याचा कारखाना आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिकांसोबतच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये मिळालेला विजय हा ऐतिहासिक असल्याचं म्हणत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.