शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम महिलेने दिली हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी, परिसरात तणाव

By admin | Updated: April 13, 2017 18:40 IST

याबाबत माहिती मिळाल्यानंतर महिलेची मदत करण्यासाठी हिंदू महासभेचे स्थानिक नेता घटनास्थळी पोहोचले आणि आणखीनच तणाव निर्माण झाला.

ऑनलाइन लोकमत
अलिगढ, दि. 13 - पती आणि सासरच्या मंडळींनी घरात घेण्यास नकार दिल्यानंतर एका मुस्लिम महिलेने हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिली आहे. मंगळवारपासून ती घराच्या बाहेर बसून आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये ही घटना घडली आहे. मुस्लिम समाजातील तीन तलाकच्या मुद्द्यावरून देशभरात बराच गदारोळ सुरू असताना या घटनेमुळे येथील परिसरात तणावाचे वातावरण आहे. मात्र, हा तीन तलाकचा मुद्दा नसल्याचं महिलेने स्पष्ट केलं आहे. 
 
येथील बुलंदशहरच्या रिहाना ( वय-30) हिचा विवाह 2012 मध्ये जमालपुरच्या मोहम्मद शरीफ सोबत झाला होता. काही महिन्यापूर्वी तिचं आणि पतीचं काही कारणास्ताव भांडण झाल्याने दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर तिला मारहाणही झाली. त्यामुळे रिहाना आपल्या 4 वर्षाच्या मुलीला घेऊन आई-वडिलांच्या घरी निघून गेली.  पण, मंगळवारी जेव्हा ती आपल्या सासरी परतली तेव्हा सासरच्यांनी तिला घरातच घेतलं नाही, तुझ्यासाठी आता या घरात जागा नाही असं तिला सांगण्यात आलं. त्यावर मला घरात घेतलं नाही तर मी हिंदू धर्म स्वीकारेल अशी धमकी रिहानाने दिली आहे.  
 
याबाबत माहिती मिळाल्यानंतर बुधवारी महिलेची मदत करण्यासाठी हिंदू महासभेचे स्थानिक नेता जमालपूर येथे पोहोचले. त्यामुळे येथील वातावरणात आणखीनच तणाव निर्माण झाला. दरम्यान पोलीस वेळेवर पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.