शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम गुन्हेगारी प्रवृत्तीचे; हिंदूंनी त्यांना घरात घेऊ नये- बनवारीलाल सिंघल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:32 IST

हिंदूंनी मुस्लिमांना घरात घेऊ नये असे वादग्रस्त उद्गार राजस्थानातल्या अलवार शहरातील भाजप आमदार बनवारीलाल सिंघल यांनी काढले आहेत.

अलवार : हिंदूंनी मुस्लिमांना घरात घेऊ नये असे वादग्रस्त उद्गार राजस्थानातल्या अलवार शहरातील भाजप आमदार बनवारीलाल सिंघल यांनी काढले आहेत. मुस्लिमांना मी घरात घेत नाही किंवा त्यांची मतेही मला नकोत, असेही सिंघल यांनी म्हटले आहे.बनवारीलाल सिंघल हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. अलवार येथे रविवारी घेतलेल्या सभेत ते म्हणाले की, मुस्लिम भाजपला कधीही मतदान करीत नाहीत. मीही मतांसाठी त्यांचे लांगुलचालन करत नाही. मुस्लिम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्या गैरकृत्यांवर पांघरुण घालावे या अपेक्षेनेच ते मला मतदान करणार. नेमके हेच मला नको आहे. याच कारणासाठी मी मुस्लिमांना कायम लांब ठेवतो.विश्व हिंदू परिषद व रा. स्व. संघाशी निकटचा संबंध असलेले बनवारीलाल सिंघल यांनी सांगितले की, गोहत्या, लव्ह जिहाद, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे अशा अनेक गुन्ह्यांत मुस्लिमांचा सहभाग असतो. अलवार येथील लोकसभा मतदारसंघात जानेवारी महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आमदार सिंघल यांनी वादग्रस्त विधाने करण्याचे प्रमाण वाढले आहे.>हिंदू मुली उच्च शिक्षण घेतल्या की सेक्युलर बनतातराजस्थानमधील अलवार व भरतपूर जिल्ह्यातील मुस्लिमांना मेओ किंवा मेवाती मुस्लिम म्हणूनही ओळखले जाते. ते कधीही आपल्या पक्षाला मतदान करत नाही याचा बनवारीलाल सिंगल यांना राग आहे. लव्ह जिहाद घडविण्यासाठीमेओ मुस्लिमांना भरपूर पैसा पुरविला जातो असा आरोपही त्यांनी केला आहे. मेओ मुस्लिम हिंदू महिलेशी लग्न करुन तिचे आयुष्य नरकासमान करतात. त्याउलट एखादी मुस्लिम महिला अल्पशिक्षित किंवा अशिक्षित असली तरी हिंदू युवकाशी अजिबात विवाह करत नाही. मुस्लिम युवकांच्या जाळ्यात अडकत असल्याबद्दल हिंदू युवतींना बनवारीलाल सिंघल यांनी दोष दिला आहे. ते पुढे म्हणाले की, बुद्धिमान व उच्च शिक्षित असलेल्या हिंदू तरुणी सेक्युलर बनतात व मेओ मुस्लिमांशी विवाहबद्ध होतात. मात्र विवाहानंतर मेओ मुस्लिम आपल्या हिंदू पत्नीपासून वेगळे होतात.