कोइम्बतूर : हिंदू मुन्नानी संघटनेच्या प्रवक्त्याची चार जणांच्या टोळीने येथे हत्या केली. या घटनेनंतर तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यासह लगतच्या तिरुपूर शहरात तणाव निर्माण झाला असून, संघटनेने शुक्रवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे कोइम्बतूर, तिरुपूरमध्ये आज बंद पबाळण्यात आला. शशी कुमार (४०) हे हिंदू मुन्नानी संघटनेचे जिल्ह्यातील प्रवक्ते होते. गुरुवारी रात्री उशिरा ते सुब्रमानियमपलयमहून दुचाकीवर परतत होते, तेव्हा अज्ञात लोकांनी दुचाकींवर त्यांचा पाठलाग करून धारदार विळ्यांनी त्यांच्यावर वार केले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
हिंदू मुन्नानी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या
By admin | Updated: September 24, 2016 06:04 IST