सख्ख्या भावाची हत्या, आरोपीला सात वर्षे कारावास
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
हायकोर्ट : बुलडाणा जिल्ातील घटना
सख्ख्या भावाची हत्या, आरोपीला सात वर्षे कारावास
हायकोर्ट : बुलडाणा जिल्ह्यातील घटनानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील आहे.बाबुराव नामदेव चव्हाण (४४) असे आरोपीचे नाव असून, तो बोरखेडी, ता. मोटाळा येथील रहिवासी आहे. मृताचे नाव श्रीराम होते. आरोपी व श्रीराम यांची घरे आमोरासामोर होती. १६ मे १९९८ रोजी श्रीराम त्याची पत्नी व मुलांसोबत घरापुढे झाडू तयार करीत होता. दरम्यान आरोपी दारू पिऊन आला. त्याने श्रीरामला जागा रिकामी करण्यास सांगितले, अन्यथा ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे श्रीरामने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर आरोपीने पुन्हा भांडण उकरून काढून श्रीरामची कट्यार भोसकून हत्या केली. २६ डिसेंबर २००१ रोजी बुलडाणा सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२(हत्या)अंतर्गत आजन्म कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला भादंविच्या कलम ३०४ (१)(सदोष मनुष्यवध)अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.