एकीचा खून तर दुसरीने जाळून घेतले!
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
जळगाव : दापोरा येथे किरकोळ कारणावरून दोन महिलांच्या झालेल्या भांडणानंतर एकीचा गळा दाबून खून झाल्याची तर दुसर्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना धूलिवंदनच्या दिवशी घडली.ज्योती शशिकांत पाटील व अनिता सोपान पाटील या महिला एकमेकींच्या शेजारी आहेत. दोन्ही महिलांमध्ये नेहमी भांडणे व्हायची होळीच्या दिवशी सकाळी पाणी भरण्यावरून ...
एकीचा खून तर दुसरीने जाळून घेतले!
जळगाव : दापोरा येथे किरकोळ कारणावरून दोन महिलांच्या झालेल्या भांडणानंतर एकीचा गळा दाबून खून झाल्याची तर दुसर्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना धूलिवंदनच्या दिवशी घडली.ज्योती शशिकांत पाटील व अनिता सोपान पाटील या महिला एकमेकींच्या शेजारी आहेत. दोन्ही महिलांमध्ये नेहमी भांडणे व्हायची होळीच्या दिवशी सकाळी पाणी भरण्यावरून दोघींमध्ये किरकोळ वाद झाला़ रात्री रेल्वेमार्गाजवळ मक्याच्या शेतात ज्योती यांचा मृतदेह आढळून आला़ त्यांच्या गळ्याला फास आवळल्याच्या खूना होत्या तर एक कान तुटलेला होता़ ज्योती यांचा मृतदेह शेतात आढळून आल्याचे कळताच अनिता यांनी भांडणातून हा प्रकार झाल्याचा समज करून घेत अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे नातेवाईक असून मलकापूर व बोदवड येथून कामासाठी दापोरा येथे स्थायिक झालेले आहेत़ (प्रतिनिधी)