मेडिकल कॉलेज कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर जिल्ाच्या बेगराजपूर गावात शुक्रवारी सकाळी शासकीय मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. वसंत नावाच्या या ३८ वर्षीय कर्मचाऱ्याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आणि मृतदेह एका शेतात फेकण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
मेडिकल कॉलेज कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या बेगराजपूर गावात शुक्रवारी सकाळी शासकीय मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. वसंत नावाच्या या ३८ वर्षीय कर्मचाऱ्याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आणि मृतदेह एका शेतात फेकण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. वसंत हा गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होता. या प्रकरणी बिल्लू नावाच्या इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटना उजेडात आल्यापासूनच बिल्लू फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)