शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत विशेष प्लास्टिकच्या भस्मासुराकडे महापालिकेचे दुर्लक्ष प्लास्टिक वेस्ट नियमावलीची अंमलबजावणी नाही : सर्रास वापर

By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST

दीपक जाधव, पुणे : उरूळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपेामध्ये कचरा टाकू देण्यास गावकर्‍यांनी मनाई केल्यापासून शहरातील कचरा प्रश्न उग्र बनलेला आहे. यापार्श्वभुमीवर वर्षानुवर्षे विघटन न होऊ शकणार्‍या प्लास्टिकच्या कचर्‍याची समस्या सोडविण्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरामध्ये खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे, प्लास्टिक वेस्ट नियमावलीची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही.

दीपक जाधव, पुणे : उरूळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपेामध्ये कचरा टाकू देण्यास गावकर्‍यांनी मनाई केल्यापासून शहरातील कचरा प्रश्न उग्र बनलेला आहे. यापार्श्वभुमीवर वर्षानुवर्षे विघटन न होऊ शकणार्‍या प्लास्टिकच्या कचर्‍याची समस्या सोडविण्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरामध्ये खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे, प्लास्टिक वेस्ट नियमावलीची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही.
कचर्‍यातील प्लास्टिक समस्येवर मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीमार्फत सखोल अभ्यास केल्यानंतर ४ फेब्रुवारी २०११ मध्ये प्लास्टिक वेस्ट (मॅनेजमेंट ॲन्ड हॅन्डलिंग) नियमावली लागू करण्यात आली. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्यांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्लास्टिक बॅग उत्पादकांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या बॅग बनविण्यास बंदी आहे. त्यापुढील बॅगची निर्मिती करताना लांबी, रूंदी आणि गेज याची तपासणी करून त्याची किंमत महापालिकेने ठरवून दिली पाहिजे. शहरातील प्लास्टिक बॅग उत्पादकांशी चर्चा करण्यासाठी समिती नेमली जावी. या समितीने त्या उत्पादकांवर नियमित लक्ष ठेवावे. प्लास्टिक उत्पादकांनी प्रत्येक पिशवीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शिक्का मारून घ्यावा अशी बंधने या नियमावलीमध्ये घालण्यात आले आहेत. मात्र शहरामध्ये किती प्लास्टिक उत्पादक आहेत याची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे समिती नेमून प्लास्टिक उत्पादकांवर लक्ष ठेवण्याच्या तरतूदीची अमंलबजावणीच झालेली नाही.
शहरामध्ये दररोज १३०० ते १४०० टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये प्लास्टिक प्रमाण १२ ते १५ टक्के इतके आहे त्यापैकी ५ ते ७ टक्के प्लास्टिक प्रक्रियेसाठी वापरले जाते मात्र उर्वरित ८ टक्के प्लास्टिक कचर्‍यातून जमिनीतच गाडले जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधी मध्ये प्लास्टिक बॅग विक्रेत्यांवर १५ हजार ५७९ खटले दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून ५४ लाख ७३ हजार २९० रूपयांचा दंड वसूल केला आहे.


चौकट
प्लास्टिकच्या वापरावर कचरा कर लावावा
शहरात भाजी मंडई, मटन विक्रेते, हार्डवेअर याठिकाणी सर्रास ५० मिमीपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर वेफर्स, कुरकरे, फरसाण आदी खाद्यपदार्थांसाठीही प्लास्टिक मोठयाप्रमाणात वापरले जात आहे. या प्लास्टिकचे रिसायकलींग करणे कंपन्यांना बंधनकारक करावे तसेच त्यांच्यावर प्लास्टिक वापराचा कचरा कर लावण्यात यावा अशी मागणी मनसेचे पर्यावरण सचिव रवी सहाणे यांनी केली आहे.