ठराव मंजूर नसताना मनपासमोर हातगाड्या नगरसेवकाच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष : खाऊगल्लीतील गाड्याही रस्त्यावर
By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST
जळगाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत आहेत. नगरसेवकाने यात रस घेतल्याने मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यामुळे रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरीत झालेल्या हॉकर्सच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत सोमवारी पुन्हा रस्त्यावर गाड्या लावल्या.
ठराव मंजूर नसताना मनपासमोर हातगाड्या नगरसेवकाच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष : खाऊगल्लीतील गाड्याही रस्त्यावर
जळगाव : मनपाने सभेत ठराव मंजूर केलेला नसतानाही मनपासमोर जनरेटर ठेवलेल्या बाजूने चार हॉकर्सच्या गाड्या लावण्यात येत आहेत. नगरसेवकाने यात रस घेतल्याने मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यामुळे रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरीत झालेल्या हॉकर्सच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत सोमवारी पुन्हा रस्त्यावर गाड्या लावल्या. वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने मनपाच्या सतरा मजली इमारतीसमोरील तसेच गोलाणी मार्केटच्या आवारातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मनपा लगतच्या बोळीत जागा देण्यात आली. हॉकर्सने आधी विरोध दर्शविला. मात्र नंतर नाईलाजाने स्थलांतराची तयारी दर्शविली. या गल्लीचे खाऊगल्ली असे नामकरण करीत तेथे व्यवसायही सुरू केला. मात्र नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनिवारी झालेल्या महासभेत मनपाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने जनरेटर ठेवलेल्या बोळीत चार हातगाड्यांना जागा देण्याचा विषय मांडला. त्यावर सभागृहात चर्चा झाली. मात्र ठराव मंजूर झालेला नाही. मात्र एरव्ही ठराव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी न करणार्या मनपा प्रशासनाने महासभा झाली त्याच दिवसापासून या जागेवर चार हातगाड्या लावण्यास सुरूवात होऊनही कारवाई केली नाही अथवा त्यांना प्रतिबंधही केला नाही. त्यामुळे मनपाचे अधिकारी व अतिक्रमण विभागही मॅनेज झाल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू झाली आहे. तर नगरसेवक इतर हॉकर्सला हटवितात व स्वत:च्या मर्जीतील लोकांना सोयीची जागा करून देत असल्याचा आरोप हॉकर्स संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे. ----- इन्फो---हॉकर्स पुन्हा रस्त्यावरमर्जीतील हॉकर्सला रस्त्याच्या लगत जागा दिल्याने रस्त्यावरून खाऊगल्लीत स्थलांतरीत झालेल्या काही हॉकर्सनी सोमवारी सायंकाळी पुन्हा रस्त्यावर गाड्या लावल्या.