गजानन जानभोर, नवी दिल्ली - चार महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक लक्षात घेता आपसात तीव्र मतभेद असलेले भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्यात मनोमिलन घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांंचाच एक भाग म्हणून गडकरी-मुंडे यांची काल गडकरींच्या बंगल्यावर भेट झाली. माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हे या वेळी उपस्थित होते. पक्षाला महाराष्ट्रात ताकद देण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा लवकरच भेटण्याचे ठरविले. दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात झाली होती. त्या वेळी मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र (पान २ वर)
मुंडे-गडकरी मनोमिलन सुरू!
By admin | Updated: May 22, 2014 04:52 IST