सेमिनरी हिल्स बालोद्यानात युवतीचा विनयभंग
By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST
सेमिनरी हिल्सच्या बालोद्यानात युवतीचा विनयभंग
सेमिनरी हिल्स बालोद्यानात युवतीचा विनयभंग
सेमिनरी हिल्सच्या बालोद्यानात युवतीचा विनयभंगनागपूर : सेमिनरी हिल्सच्या बालोद्यानात आपल्या मित्रासोबत गेलेल्या २० वर्षीय फिर्यादी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षीय फिर्यादी युवती मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सेमिनरी हिल्सच्या बालोद्यानातील रेल्वे रुळाजवळ मित्राबरोबर बसली होती. तेवढ्यात आरोपी गुरुमितसिंग वचनसिंग बाबरा (४०) रा. कामठी रोड, गुरुद्वाराजवळ सदर हा तेथे आला. त्याने येथे मौजमजा करायला येता काय असे बोलून युवतीच्या मित्राच्या गालावर थापड मारली. त्याने दोघांनाही उठकबैठक करावयास सांगितले. युवतीने नकार दिल्यामुळे आरोपीने तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तिने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.