शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुलायम सिंहांचा पंतप्रधानांसोबतच्या 'कान की बात'चा खुलासा

By admin | Updated: March 21, 2017 11:02 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादवांमध्ये झालेल्या गळाभेटीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 21 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव या दोघांमध्ये झालेली गळाभेट आणि 'कान की बात'चा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. यावेळी मुलायम सिंह यादव पंतप्रधान मोदींच्या कानात नेमके काय पुटपुटले असावे,  याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्याचा खुलासा आज समोर आला आहे. 
 
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला मुलायम सिंग पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दिल्याचे दिसले. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली.
 
मुलायम सिंह यादव पंतप्रधानांच्या कानात काय पुटपुटले याचा खुलासा इंग्रजी वृत्तपत्र 'द टेलिग्राफ'ने केला आहे. टेलिग्राफने दिलेल्या बातमीनुसार, मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधानांना मुलगा अखिलेश यादव यांची काळजी घ्यायले सांगितले. ‘थोडा अखिलेश का खयाल रखिये… और इनको सिखाईये…’ असे मुलायम मोदींच्या कानात बोलल्याची माहिती मिळत आहे.
भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपा-काँग्रेस आघाडीचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला व सरकारही स्थापन केलं. दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत केलेली युती मुलायम सिंह यादव यांना कधीही पटली नव्हती. यावर त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली. यावरुनच यादव यांनी मोदींना मुलगा अखिलेश यांची काळजी घ्यायला सांगून याद्वारे मुलाप्रती असलेले प्रेम व काळजीही व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.   
 

मोदी-मुलायम यांची गळाभेट; गुजगोष्टी

लखनऊच्या कांशीराम स्मृती उपवन मैदानावर रविवारी  सकाळी उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा तासभर चाललेल्या शपथविधी सोहळ्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची झालेली गळाभेट हे मोठे आकर्षण ठरले.

सर्व मंत्र्यांच्या शपथविधी पार पडल्यावर पंतप्रधान मोदी उठून तेथून बाहेर निघणार तेवढ्यात मुलायम सिंह यांनी त्यांना थांबवले व मोदीही थांबले. दोघांनी परस्परांना आलिंगन दिले. एवढेच नव्हे तर मुलायम सिंह पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दिल्याचे दिसले. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली. मुलायम-मोदी यांच्यातील गुजगोष्टीचा खुलासा 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्रातून अखेर समोर आला आहे.