शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिरासाठी अयोध्येत हालचाली

By admin | Updated: June 21, 2017 01:38 IST

उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने

अयोध्या : उत्तर प्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्याने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानून विश्व हिंदू परिषदेने मंदिर बांधकामासाठी रामनाम कोरलेले दगड (रामशिला) आणून त्यांचा साठा करण्यास पुन्हा सरुवात केली आहे.बाबरी मशिद- रामजन्मभूमीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम वर्षभरात सुरु केले जाईल, असे विहिंपने याआधीच जाहीर केले आहे. विहिंपचे ज्येष्ठ नेते त्रिलोकी नाथ पांडे यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामासाठी एक हजाराहून जास्त ट्रक भरून रामशिला लागणार आहेत. त्यापैकी पहिले दोन ट्रक राजस्थानमधून भरतपूर येथून सोमवारी येथे पोहोचले. त्या ट्रकमधून आणलेल्या रामशिला कारसेवकपूरम येथे उतरवून घेण्यात आल्या. बाकीच्या रामशिलांचे ट्रकही येत्या काही दिवसांत येतील व मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल, असेही पांडे म्हणाले.सन २०१५ मध्येही विहिंपने देशभरातून अशा रामशिला आणण्याचा प्रयत्न केला होता. पण पहिले दोन ट्रक आल्यावर समाजवादी पक्षाच्या राज्य सरकारने अशा वाहतुकीसाठी लागणारे ‘फॉर्म ३९’ देणे बंद केले व रामशिलांची जमवाजमव तेवढ्यावरच थांबवली होती. पांडे म्हणाले की, महिनाभरापूर्वी आम्ही संबंधित अधिकाऱ्याला भेटलो व त्याने लगेच ‘फॉर्म ३९’ देण्याचे आदेश काढले. (वृत्तसंस्था)राममंदिर बांधण्यावर आपण ठाम आहोत, याचा संदेश देण्यासाठी भगव्या संघटनांची ही दगडांची जमवाजमव सुरू आहे. पण त्याने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही. राज्यघटनेनुसार न्याय होईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.- खलिक अहमद, सुप्रीम कोर्टातील पक्षकारप्रकरण न्याप्रविष्ट असूनही असे करणे बेकायदाच नव्हे तर देशविरोधीही आहे. यामुळे सांप्रदायिक तणाव वाढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल.- रूपरेखा वर्मा, माजी कुलगुरु, लखनऊ विद्यापीठ