शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सासऱ्याने सुनांना घराबाहेर काढले

By admin | Updated: March 5, 2017 01:28 IST

अमेरिकेतील दोन मुलांनी व्हॉटस् अ‍ॅपद्वारे तलाकचे संदेश पाठविल्यानंतर सासू-सासऱ्याने सुनांना मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना हैदराबादेत घडली.

हैदराबाद : अमेरिकेतील दोन मुलांनी व्हॉटस् अ‍ॅपद्वारे तलाकचे संदेश पाठविल्यानंतर सासू-सासऱ्याने सुनांना मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना हैदराबादेत घडली. सुनांच्या तक्रारीवरून सासू-सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल सोेहेल आणि अब्दुल अकील हे भाऊ अमेरिकेत असतात. पाच दिवसांपूर्वी त्यांनी व्हॉटस्अ‍ॅपद्वारे त्यांच्या पत्नींना तलाकचा संदेश पाठविला. हा संदेश मिळताच सासू आणि सासऱ्याने दोन्ही सुनांना घराबाहेर काढले. सुनांनी विरोध केला तेव्हा त्यांनी त्यांना मारहाण केली. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर मोघलपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोहंमद हाफीज (६०) व पत्नी अथिया यांना अटक केली. एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यामुळे अब्दुल सोहेल आणि अब्दुल अकील हे दोघे गेल्यावर्षी न्यूयॉर्कला गेले होते. अब्दुलचा हिना फातिमा यांच्याशी २०१२ मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहेत. अकीलचा २०१५ मध्ये मेहरेन नूर यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक अपत्य आहे. दोन्ही भावांनी तीनदा तलाक असे स्टेटस ठेवून त्याचा फोटो व्हॉटस् अ‍ॅपवर टाकला. आम्हाला घटस्फोट दिला जावा, असे काहीही चुकीचे वर्तन आम्ही केले नाही. त्यांना घटस्फोट घ्यायचा असेल तर तो त्यांनी कायदेशीररीत्या आणि सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला हवा. ते आम्हाला असा घटस्फोट देऊ शकत नाहीत, असे हिना फातिमा म्हणाल्या. (वृत्तसंस्था)त्यांना घरी कसे ठेवू?माझ्या मुलांनी त्यांना घटस्फोट दिला असल्यामुळे मी त्यांना घरात ठेवू शकत नाही. म्हणूनच मी त्यांना त्यांच्या मुलांसह घराबाहेर काढले, असे मुलांचे वडील मोहंमद हाफीज यांनी म्हटले.