शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईनेच 2 वर्षाच्या मुलाला फेकले जीन्यावरुन

By admin | Updated: January 27, 2017 18:36 IST

राजधानी दिल्लीमधील एक धक्कादायक घटना सीसीटिव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - राजधानी दिल्लीमधील एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे. दिल्लीमधील प्रल्हादपूर भागात एका महिलेने दोन वर्षाच्या पोटच्या मुलाला जीन्यावरुन खाली फेकले. या धक्कादायक घटनेनंतर महिलेच्या पतीनं पोलीस स्थानकात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडली आहे. यानंतर 24 जानेवारी रोजी पती-पत्नीचे जोरदार भांडण झाले होते. मदतीसाठी पीसीआरला फोन करण्यात आला होता. या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर त्यांना सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

दरम्यान, या घटनेत 2 वर्षाचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणाही आढळून आल्या आहेत. घटनेच्या चार दिवसांनंतरही महिलेला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. 24 जानेवारी रोजी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलाचे वडील नितिन गुप्ता यांनी सांगितले की, पत्नी सोनू गुप्तासोबत घरगुती वाद-विवाद होता. 21 तारखेला सोनू आणि आई-बाबांमध्ये भांडण झाले. त्यावेळी रागात सोनूने पहिल्यांदा सर्व कपडे फेकले, त्यानंतर दोन वर्षाच्या अंशुलला पाय-यांवरुन बाहेर फेकून दिले. मुलाला फेकल्याची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  

पाच वर्षापूर्वी नितिन आणि सोनू यांनी घरच्यांच्या विरोधानंतरही प्रेमविवाह केला. लग्नानंतर चार महिन्यातच दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली, अशी माहिती नितिन गुप्ताच्या वडिलांनी दिली आहे.