शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बहुतेक प्रभागांमध्ये २ किंवा ३ मतदानयंत्रे शक्य

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला यंदा प्रथमच ४ उमेदवारांना मते द्यावयाची असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये २ किंवा ३ मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन) असू शकतील. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेची माहिती सर्व मतदारांना असावी यासाठी निवडणूक यंत्रणेला दक्षता घ्यावी ...



पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला यंदा प्रथमच ४ उमेदवारांना मते द्यावयाची असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांची संख्या पाहता बहुतेक प्रभागांमध्ये २ किंवा ३ मतदानयंत्रे (इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन) असू शकतील. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेची माहिती सर्व मतदारांना असावी यासाठी निवडणूक यंत्रणेला दक्षता घ्यावी लागणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक मतदाराला २ उमेदवारांना मते द्यावयाची होती. आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारास ४ उमेदवारांना मते द्यावयाची आहेत. मतदानयंत्रांची रचनाच अशी असेल की प्रत्येक मतदाराला ४ मते द्यावीच लागतील. प्रत्येक मत नोंदणीनंतर मत पूर्ण झाल्याचा विशिष्ट संकेतध्वनी यंत्रातून येतो. एक मत दिल्याशिवाय दुस-या मतासाठी यंत्राची सज्जता होऊ शकत नाही. प्रत्येक मत दिल्यानंतरच कंट्रोल बॉक्स ओपन होऊन दुसरे मत किंवा कोणालाही मत नाही (नोटा)नोंदणी होईल. त्यानंतरच एका मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.
त्यामुळे एका मतदाराला चारही मते नोंदवावीच लागतील. मतदाराला अपेक्षित असलेली २ किंवा ३ मते देऊन तो यंत्रापासून दूर जाऊ शकणार नाही. एखाद्या नापसंत उमेदवारऐवजी त्याला कोणालाही मत नाही (नोटा)हा पर्याय अवलंबिता येणे शक्य आहे.
मतदार याद्या अद्ययावत असल्यास, मतदान कसे करावे याबाबत निवडणूक यंत्रणेने प्रबोधन केलेले असल्यास एका मतदाराला मत नोंदविण्यासाठी ४० ते ५० सेकंद पुरेसे असून मतदान झाल्यानंतर बोटाला खुणेची शाई लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेस सुमारे १ मिनिटांचा अवधी लागेल.
आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे या पक्षांशिवाय अन्य काही पक्ष व अपक्ष यांची भाऊगर्दी बहुसंख्य प्रभागांमध्ये असणार आहे. राजकीय पक्षांचे २० व अन्य असे मिळून २४ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असू शकतील.
एका इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिनमध्ये एकावेळी १२ उमेदवारांची मते नोंदविण्याची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक मते एका यंत्रावर नोंदवायची झाल्यास त्याप्रकारचे तंत्र राज्य शासनाच्या निवडणूक शाखेला अवलंबावे लागणार आहे. साधारणत: एका मतदान केंद्रावर २ किंवा ३ यंत्रे असण्याची दाट शक्यता आहे.
एखाद्या मतदाराने ४ ऐवजी कमी मते दिली तर त्याला सर्व मते देण्याबाबत किंवा नोटाचा वापर करण्याबाबत निवडणूक अधिका-यांना सुचना द्याव्या लागण्याची शक्यता असून त्यामुळे मतदानाचा वेळ वाढू शकेल. अन्य निवडणुकांच्या तुलनेत नगरपरिषद किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या अधिक असते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीने क्लिष्टता वाढणार असून मतमोजणीसाठी लागणारा वेळही वाढणार आहे.
निवडणूक यंत्रणेत काम करण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या एका जाणकाराने सांगितले की ४ उमेदवारांच्या प्रभागामुळे मतदान यंत्रणेपुढचे काम वाढू शकेल. या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे याबाबत निवडणूक शाखेने आतापासूनच मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.