शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश सराफा व्यापाऱ्यांकडून संप मागे

By admin | Updated: April 13, 2016 02:44 IST

देशातील बहुतेक सराफांचा संप तब्बल सहा आठवड्यांनंतर मंगळवारी संपला. सोन्याच्या दागिन्यांवरील नियोजित एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी सोन्या-चांदीचे

नवी दिल्ली : देशातील बहुतेक सराफांचा संप तब्बल सहा आठवड्यांनंतर मंगळवारी संपला. सोन्याच्या दागिन्यांवरील नियोजित एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी सोन्या-चांदीचे व्यापारी, दागिने विक्रेते व कारागीर दोन मार्चपासून संपावरहोते. महाराष्ट्रातील सराफांनी त्यांचा संप १४ ते २४ असा तात्पुरता मागे घेतला आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील दागिन्यांची दुकाने उघडली होती, तर दिल्ली आणि मुंबईतील दागिन्यांचे काही शोरूम्स आणि दुकाने उघडी होती व काही बंद. अबकारी कराची अंमलबजावणी सोपी करण्याचे आश्वासन राजस्थान सरकारने दिल्यानंतर दागिने व सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली, असे राजस्थान सराफा संघाचे अध्यक्ष सुभाष मित्तल यांनी सांगितले. मागणी मान्य न झाल्यास संप पुन्हा सुरू केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांच्या नेतृत्वाखालील समिती सराफांच्या मागण्यांचा विचार करणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत सराफांचा संप मागे घेतला जाईल, असे व्यापार महासंघ असोचेमचे राष्ट्रीय मोती आणि दागिने विभागाचे अध्यक्ष शंकर सेन यांनी सांगितले.