शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

भारताला विदेशातून मिळाला सर्वाधिक पैसा

By admin | Updated: April 15, 2015 01:48 IST

२०१४ मध्ये भारताला विदेशात राहणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक भारतीयांनी आपल्या मायदेशाला ७० अब्ज डॉलर पाठविले आहेत.

वॉशिंग्टन : विदेशात राहणाऱ्या नागरिकांकडून मिळणाऱ्या पैशांबाबत भारताचे स्थान अगदी वरचे असून २०१४ मध्ये भारताला विदेशात राहणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक भारतीयांनी आपल्या मायदेशाला ७० अब्ज डॉलर पाठविले आहेत. जागतिक बँकेच्या द्विवार्षिक ‘दक्षिण आशिया आर्थिक झोत’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, एवढा मोठा पैसा पाठविण्यामागचे कारण हे युरोपातील कमकुवत आर्थिक वाढ, रशियाच्या अर्थव्यवस्थेची झालेली घसरण आणि रशियाचा रूबल व युरोचे झालेले अवमूल्यन होय. २०१५ मध्ये विकसनशील राष्ट्रांना अशा पद्धतीने ४४० अब्ज अमेरिकन डॉलर पाठविले जातील अशी अपेक्षा आहे. ही रक्कम २०१४ च्या तुलनेत ९ टक्क्यांनी जास्त असेल. जास्त उत्पन्न असलेल्या देशांसह जागतिक पातळीवर अशा प्रकारे पाठविला जाणारा पैसा ०.४ टक्क्यांनी वाढून ५८६ अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया, जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये जाऊन लोकांची काम करायला पसंती असते. याबरोबरच भारताशिवाय चीन, फिलिपीन, मेक्सिको आणि नायजेरिया या देशांत विदेशांतून येणारा पैसा हा सर्वांत जास्त आहे. जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ व वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू म्हणाले की, ‘‘२०१४ मध्ये एकूण पाठविण्यात आलेला पैसा ५८३ अब्ज डॉलरवर गेला आहे. भारताला ७०, चीन ६४, फिलिपीन २८ अब्ज डॉलर मिळाले. नव्या विचारांनुसार या पैशांचा वापर पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासासाठी केला जाऊ शकतो.’’ (वृत्तसंस्था)