महसूल व पोलीसांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
महसूल व पोलिसांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी
महसूल व पोलीसांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी
महसूल व पोलिसांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी विभागीय लोकशाही दिन : १७ तक्रारी प्राप्त नागपूर : अप्पर आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून १७ तक्रारी स्वीकारण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या महसूल विभाग आणि पोलीस विभागाशी संबंधित होत्या. प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये जिल्हाधिकारी नागपूरशी संबंधित ३, जिल्हाधिकारी वर्धा-१, जिल्हाधिकारी भंडारा-१, जिल्हाधिकारी चंद्रपूर-१, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नागपूर -२, पोलीस आयुक्त नागपूर - ४, महानगरपालिका नागपूर - १, भूमी अभिलेख उपसंचालक नागपूर-१, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण -१, विभागीय कृषी सहसंचालक -१, नस्तीबद्ध-१ अशा एकूण १७ तक्रारींचा समावेश होता. तसेच जुन्या २१ तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. या लोकशाही दिनाला नागपूर सुधार प्रन्यास, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर महानगरपालिका, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., पोलीस अधीक्षक ग्रामीण, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.