शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

चारपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास होणार १५० रुपयांचा भुर्दंड

By admin | Updated: March 2, 2017 12:17 IST

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक आदी बँकांनी बुधवारपासून एका महिन्यात चारहून अधिक व्यवहारांवर (पैशांचा भरणा किंवा ते काढणे)

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 01 - एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक आदी बँकांनी बुधवारपासून एका महिन्यात चारहून अधिक व्यवहारांवर (पैशांचा भरणा किंवा ते काढणे) प्रति व्यवहार १५० रुपये शुल्क आकारणी सुरू केली आहे. हे शुल्क बचत त्याचप्रमाणे वेतन खात्यांनाही लागू असेल, असे एचडीएफसीच्या एका परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकानुसार, एचडीएफसी बँकेने तिसऱ्या पक्षासाठी व्यवहाराची मर्यादा प्रति दिन २५ हजार एवढी निश्चित केली असून, रोख हाताळणी शुल्क मागे घेतले आहे. लोकांना रोख व्यवहारापासून परावृत्त करून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी उचललेले पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. शून्य जमा असणाऱ्या खात्यांसाठी कमाल चार वेळा नि:शुल्क पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवली असून, रोख भरण्यावर त्यांना कोणतेही शुल्क लागणार नाही. आयसीआयसीआय बँकेचे नोटाबंदीपूर्वी जे शुल्क होते तेच राहणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटनुसार, मूळ शाखेत (जेथे खातेधारकाचे खाते आहे.) एका महिन्यात चार देवाण-घेवाणीवर (पैसे भरणे आणि काढणे ) कोणतेही शुल्क लागणार नाही. त्यानंतर दर हजाराला पाच रुपयांचे शुल्क लागेल. त्या महिन्यात असे किमान १५० रुपयांचे शुल्क आकारले जाईल. मूळ शाखा नसलेल्या शाखेत करण्यात आलेल्या पहिल्या व्यवहाराला आयसीआयसीआय बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. तथापि, त्या महिन्यातील त्यानंतरच्या अशा व्यवहाराला दर हजाराला पाच रुपये शुल्क आकारले जाईल. यासाठी किमान शुल्क १५० रुपये ठेवण्यात आले आहे. कुठेही रोख भरणा करण्यासाठी आयसीआयसीआय बँक प्रति हजार ५ रुपये (किमान १५० रुपये) शुक्ल आकारेल. रोकड स्वीकारणाऱ्या मशीनमध्ये एका महिन्यातील पहिला भरणा नि:शुल्क असेल. त्यानंतर १ हजार रुपयांसाठी ५ रुपये शुल्क लागेल. अ‍ॅक्सिस बँकेतही पहिले पाच व्यवहार किंवा दहा लाख रुपयांपर्यंतची देवाण-घेवाण नि:शुल्क असेल. त्यानंतर प्रति एक हजार रुपयांवर ५ रुपये किंवा १५० रुपये यापेक्षा जे अधिक असेल तेव्हढे शुल्क आकारले जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही असेच पाऊल उचलले किंवा काय हे लगेच समजू शकले नाही. याबाबत संपर्क साधल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सरकारकडून याबाबत बँकांना कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचे सांगितले