शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यक क्षेत्रफळापेक्षा अधिक बांधकाम गोलाणी लेखा परीक्षण अहवाल: २३ मुद्यांवरील आक्षेप महापालिका प्रशासनास सादर

By admin | Updated: July 27, 2016 22:09 IST

जळगाव : गोलाणी मार्केट व तत्कालीन पालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या कामाकरिता क्षेत्रफळापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे बांधकाम करून उत्पन्न नसताना जबाबदारीत वाढ करून घेतल्यासह २३ गंभीर स्वरूपाचे आक्षेप गोलाणी मार्केटच्या बांधकामासंदर्भातील लेखा परीक्षण अहवालात घेण्यात आले आहे. हा अहवाल मनपा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.

जळगाव : गोलाणी मार्केट व तत्कालीन पालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या कामाकरिता क्षेत्रफळापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे बांधकाम करून उत्पन्न नसताना जबाबदारीत वाढ करून घेतल्यासह २३ गंभीर स्वरूपाचे आक्षेप गोलाणी मार्केटच्या बांधकामासंदर्भातील लेखा परीक्षण अहवालात घेण्यात आले आहे. हा अहवाल मनपा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.
तत्कालीन नगरपालिकेने बांधलेली १७ मजली इमारत व व.वा. संकुल (गोलाणी मार्केट) बांधकामाच्या प्रकरणाचे १ एप्रिल १९८८ ते ३१ मार्च २००१ या कालावधीचे विशेष लेखापरीक्षण ५ एप्रिल २०१६ पासून सुरू करण्यात येऊन १५ जून २०१६ ला ते पूर्ण करण्यात आले. १६ जून रोजी मनपा आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर लेखापरीक्षण अहवाल अंतिम करण्यात आला.
१३ वर्षे चालले बांधकाम
१९८८ मध्ये मनपाची प्रशासकीय इमारत व गोलाणी संकुलाचे काम सुरू करण्यात आले. एकूण ५ एकर ३२ आर क्षेत्रफळ असलेली जागा भुसावळ येथील गोलाणी ब्रदर्स यांना विकसित करण्यासाठी तत्कालीन पालिकेने दिली होती. या जागेत बेसमेंट, तळमजला व पहिला ते चौथा मजल्यापर्यंत १७२१ गाळे व दुकाने बांधणे व १७ मजली इमारत नगरपालिकेसाठी बांधणे प्रस्तावित होते. करारनाम्यानुसार विकासकाने बांधण्यात येणारी दुकाने गाळे यांच्या बुकिंगसाठी ना परतावा रकम स्विकारून स्वत:कडे ठेवायची होती व गाळे ५० वर्षांच्या भाडेकराराने द्यावयाचे होते. तसेच १७ मजली इमारत नगरपालिकेस विना मोबदला सुपुर्द करावयाची होती. संपूर्ण काम दोन वर्षात पूर्ण करावयाची अट होती. मात्र हे मार्केट २००१ मध्ये म्हणजे १३ वर्षांनी पूर्ण करण्यात आले.
जादा रकम दिली
१७ मजली व गोलाणी मार्केटच्या बांधकामाचे नकाशे व खर्चाचे अंदाजपत्रक नगरपालिकेने तयार केले होते. त्यानुसार अंदाजित बांधकाम खर्च १२ कोटी २५ लक्ष अपेक्षित होता. संपूर्ण बांधकाम विकासकाने स्वखर्चाने करावयाचे असताना नगरपालिकेने विविध कारणास्तव विविध ठराव करून विकासकाला १२ कोटी ७५ लाख रुपये दिल्याचे या अहवालात नमूद आहे.