शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ग्राहकांना अधिक सवलती

By admin | Updated: April 26, 2015 01:43 IST

स्पेक्ट्रमची ‘मल्टी डायमेंशनेलिटी’ वाढविल्यामुळे दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारून ग्राहकांना आणखी सवलती आणि उत्तम सेवा मिळतील,

नवी दिल्ली : स्पेक्ट्रमची ‘मल्टी डायमेंशनेलिटी’ वाढविल्यामुळे दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारून ग्राहकांना आणखी सवलती आणि उत्तम सेवा मिळतील, असे आश्वासन पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत दिले. कॉल ड्रॉप होण्याविषयी मोबाईल कंपन्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारने मोबाईल फोन एअरवेव्हचा लिलाव केला आहे, त्यातून सरकारला मोठा फायदा झाला आहे; पण सरकार मोबाईलधारकांच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून कंपन्यांना निर्देश देणार आहे का, असा प्रश्न खा. संजय राऊत यांनी केंद्रीय दूरसंचारमंत्र्यांना विचारला. त्यांच्या अनुपस्थितीत पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी उत्तर दिले. प्रधान म्हणाले, या लिलावातून सरकारला सध्या ३२ हजार कोटी रूपये मिळाले. पुढील दहा वर्षांत १ लाख ८३ हजार कोटी रूपये एकूण महसूल प्राप्त होईल. सरकारने जनतेचेच हित लक्षात ठेवून हा व्यवहार केला आहे. त्यामुळे सध्या ज्या समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागतो, त्यात दर्जात्मक सुधारणा होतील. दूरसंचाराची नवी पध्दत बदलत आहे. भारतातील सर्वांना डिजिटल इंडियाशी जोडले जाईल. मोबाईलचे दर ‘ट्राय’ निश्चित करत असते. दर वाढणार नाहीत, उलट नव्यातंत्रामुळे कमी होण्याचीच शक्यता अधिक आहे. (विशेष प्रतिनिधी)1 याच विषयाला पूरक प्रश्न राज्यसभा सदस्य व लोकमत मीडिया लिमिटेडच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारला होता. सरकारकडे कोट्यवधी रूपये गोळा झाले पण कॉल ड्रॉपच्या समस्या वाढल्याचे दिसून येते. एका कॉलमध्ये अनेक कॉल होत आहेत. अ‍ॅड- आॅन - सर्व्हिसच्या नावाखाली ३० रूपये तर कधी ५० रूपयांचे वाढीव देयक पाठविले जाते. या दंडामुळे अकारण ग्राहक भरडला जातो. हे शोषण कधी थांबेल, सरकारकडे काही व्यवस्था आहे का, या दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात प्रधान म्हणाले, या समस्यांचे निराकरण सरकार करत आहे. एकाधिकार होऊ नये याची काळÞजी ‘ट्राय’ घेत आहे. सरकार व कंपन्याही त्या निर्णयात बांधील आहेत. 2 हा सारा प्रकार टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे. पूर्वी २१०० ते ८०० अशा मेगाहर्टचा लिलाव वेगवेगळा झाला आहे. यावेळÞी पध्दत बदलण्याने ग्राहक त्रस्त होणार नाहीत, यासाठी कंपन्याही नवीन तंत्र विकसित करत आहेत. मंत्र्याच्या याच उत्तरावर खा. अजय संचेती यांनी कंपन्या ग्राहकांसाठी मूलभूत सोयी वाढविणार का, असा पूरक प्रश्न विचारला होता. नवीन तंत्र विकसित करण्याच्या सूचना गुंतवणूकदार व कंपन्यांना दिल्या आहेत, असे प्रधान म्हणाले.