शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धर्म बदलून शंभरहून अधिक अल्पवयीन मुलांची पॅरिसला रवानगी

By admin | Updated: April 28, 2017 03:48 IST

पंजाबच्या अमृतसर भागातील अल्पवयीन मुलांना जात, धर्म बदलून पॅरिसला पाठविल्यासंदर्भात आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबई : पंजाबच्या अमृतसर भागातील अल्पवयीन मुलांना जात, धर्म बदलून पॅरिसला पाठविल्यासंदर्भात आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्या चौकशीत शंभरहून अधिक मुलांना अशा प्रकारे पॅरिसला पाठवल्याचे समोर आले आहे. सुनील नंदवानी (५३), नरसैया मुंजली (४५) अशी आरोपींची नावे आहेत. पंजाबच्या अमृतसर भागातल्या चार अल्पवयीन मुलांना (१४ ते १८ वयोगट) पॅरिसला पाठवण्याची तयारी सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या जबरी चोरी दरोडाविरोधी पथकाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर या टोळीच्या साथीदारांना अटक केली. त्यांच्या चौकशीत या मानवी तस्करीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात आरिफ फारुकी (३८), राजेश पवार, फातिमा अहमद या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत नंदवानी आणि मुंजलीची नावे समोर आली. त्यानंतर बुधवारी या दोघांनाही मोबाइल लोकेशनवरून अटक करण्यात आली. नंदवानी हा कल्याणचा रहिवासी आहे. तर मुंजली नालासोपारा येथे राहतो. नंदवानी याने नुकतीच पाच ते सहा मुलांची पॅरिसला रवानगी केली होती. त्यात आणखी दोन मुलांना तो फ्रेंच व्हिसाच्या आधारे बाहेर पाठविण्याच्या तयारीत होता. मात्र, पासपोर्टचे काम न झाल्याने त्याचा प्रयत्न फसला. नंदवानी व मुंजली या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरिफच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मानवी तस्करी करणारे दलाल मोठ्या प्रमाणावर आहेत. अमली पदार्थाच्या वाढत्या प्रमाणामुळे तेथील पालकच मुलांना विदेशात पाठवतात. त्यासाठी स्वत: १० ते १५ लाख खर्च करतात. युरोपातील ओळखीच्या व्यक्तीच्या विश्वासावर ही मानवी तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. जात-धर्म, नाव चुकीचे दाखवूनही पासपोर्ट मिळतोच कसा, यासंदर्भातही आता तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)