शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकाच्या गॅसची मासिक दरवाढ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:12 IST

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसवर (एलपीजी) दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करून अखेरीस ते पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी या गॅसच्या अनुदानित सिलिंडरच्या दरात दरमहा चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसवर (एलपीजी) दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करून अखेरीस ते पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी या गॅसच्या अनुदानित सिलिंडरच्या दरात दरमहा चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. त्यानुसार आॅक्टोबरपासून अशी वाढ पेट्रोलियम कंपन्यांनी केलेली नाही.अनुदान शून्यावर येईपर्यंत दरमहा अनुदानित गॅसची किंमत जून २०१६ पासून दरमहा चार रुपयांनी वाढवावी, असे सरकारने सांगितले होते. परंतु आॅक्टोबरमध्ये सरकारने कंपन्यांना दिलेला हा आदेश मागे घेतला. अशा प्रकारे गेल्या १७ महिन्यांत एलपीजी सिलिंडरची किंमत १९ वेळा मिळून एकूण ७६.५ रुपयांनी वाढविली गेली होती. सूत्रांनुसार आॅक्टोबरपासून अनुदान कमी करण्यासाठी म्हणून अनुदानित सिलिंडरची किंमत वाढविली गेलेली नाही. तरीही किमतीत जी वाढ झाली आहे ती अन्य कारणांनी झाली आहे.>विरोधाभास झाला दूरएकीकडे ‘उज्ज्वला ’ योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना विनामूल्य स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी द्यायची, पण दुसरीकडे रिफिल सिलिंडरची किंमत मात्र वाढवत राहायचे हा विरोधाभास दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.