मुंबई : मोसमी वा-याने अंदमानला चाहूल दिली असतानाच आता ५ जून रोजी मान्सून केरळच्या दक्षिण किनारपट्टीला दस्तक देणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ साली मान्सून केरळात १ जून रोजी दाखल झाला होता. यावर्षीचा दिर्घकालीन विचार करता आणि मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार, देशात सरासरी ९५ टक्के इतक्या मान्सुनचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. आणि सर्वसाधारणरित्या ही सरासरी ९६-१०४ टक्क्यांच्या जवळपास नोंदविण्यात येईल. हवामानाच्या पहिल्या अंदाजानुसार मान्सूनमध्ये प्रथमत: घट नोंदविण्यात येईल. तरिही ती ३० टक्क्यांच्या आसपास राहील. शिवाय मान्सूनचा पुढील अंदाज जुन महिन्याच्या पूर्वाधात व्यक्त करण्यात येईल.
दरम्यान, पुढील ४८ तासांत नेऋत्य मोसमी पावसाच्या आगमनास दक्षिण अंदमान समुद्रात आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडयाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
..................
केरळात मान्सून दाखल झाल्याच्या तारखा...
वर्षे तारिख
२००९ २३ मे
२००८ ३१ मे
२००७२८ मे
२००६ २६ मे
२००५७ जून
२००४३ जून
२००३ १३ जून
२००२ ९ जून
२००१ २६ मे
२००० १ जून