शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

उंदरांनी ढोसली नऊ लाख लिटर दारू, बिहार पोलिसांचा अजब दावा

By admin | Updated: May 4, 2017 23:10 IST

गोदामात ठेवलेली धान्यांची पोती उंदरांनी अनेकदा फस्त केल्याचं आपण नेहमी ऐकतो. पण आता उंदरांनाही दारूचं व्यसन जडलंय असं वाटतं.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि, 4 - उंदरांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. गोदामात ठेवलेली धान्यांची पोती उंदरांनी अनेकदा फस्त केल्याचं आपण नेहमी ऐकतो. पण आता उंदरांनाही दारूचं व्यसन जडलंय असं वाटतं. कारण दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये उंदरांनी 9 लाख लिटर दारू फस्त केल्याचे समोर आले आहे, हा आमचा दावा नाही तर हा अजब दावा आहे बिहार पोलिसांचा.
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात संपूर्ण राज्यात दारूबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या पोलीस स्थानकातील गोदामांमधून गायब असल्याचं वृत्त बिहारच्या स्थानिक माध्यमांनी दिल्यानंतर उंदरांचा हा महाप्रताप उघडकीस आला आहे.  जप्त करण्यात आलेली दारू नष्ट करण्यात आली तर उर्वरित दारू उंदरांनी फस्त केली असं स्पष्टीकरण येथील पोलिसांनी दिलं आहे. 
 
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश  देण्यात आले असल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक एस .के.सिंघल यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. 
 
यापुर्वी येथील दोन पोलिसांना जप्त केलेली दारू संपवण्यामध्ये हात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून त्यांना 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.