पाण्यासाठी माकडांची भटकंती
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
वानेगाव : येथे दिवसेंदिवस माकडांची संख्या वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व माकडांच्या टोळ्या गावातच असतात. गावातील झाडांचा कोवळा पाला खाऊन ती जगतात. त्यामुळे गावातील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आंब्याचा मोहर माकडांनी फस्त केला आहे. चिंचेचा पाला, फुले सर्व काही संपुष्टात आले आहे. जुन्या घरांची पडझड होत आहे. परिसरात जवळपास पाणी नसल्यामुळे दूरवर पाण्यासाठी भटकंती सुरू असते. लोक त्यांना दररोज इकडेतिकडे पिटाळत असतात. अशा परिस्थितीमुळे ती आता एकट्या माणसाला जुमानत नाहीत. शाळेतील मुले व महिलांसाठी खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.
पाण्यासाठी माकडांची भटकंती
वानेगाव : येथे दिवसेंदिवस माकडांची संख्या वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व माकडांच्या टोळ्या गावातच असतात. गावातील झाडांचा कोवळा पाला खाऊन ती जगतात. त्यामुळे गावातील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आंब्याचा मोहर माकडांनी फस्त केला आहे. चिंचेचा पाला, फुले सर्व काही संपुष्टात आले आहे. जुन्या घरांची पडझड होत आहे. परिसरात जवळपास पाणी नसल्यामुळे दूरवर पाण्यासाठी भटकंती सुरू असते. लोक त्यांना दररोज इकडेतिकडे पिटाळत असतात. अशा परिस्थितीमुळे ती आता एकट्या माणसाला जुमानत नाहीत. शाळेतील मुले व महिलांसाठी खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.लोकशाही शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्वदावरवाडी : कुतुबखेडा (ता. पैठण) येथे विविध विकास सेवा सहकारी सोसायटी, कुतुबखेडा/दादेगाव निवडणुकीसाठी १३ जागांसाठी शुक्रवार, दि.१३ रोजी मतदान झाले. यात रामकिसन चितळे यांच्या लोकशाही शेतकरी विकास पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले, तर नंदकुमार पठाडे यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले.परसराम दे. हजारे, रामकिशन चितळे, सुनील काकडे, मच्छिंद्र पठाडे, दिगंबर हजारे, आबासाहेब हजारे, मुरलीधर गहाळ, शोभाबाई संपतराव झिणे, गीताबाई ज्ञानदेव हजारे, नंदकुमार पठाडे, विजय हजारे, संगीता नारायण करंगळ, नारायण गिरी यांचा विजयी उमेदवारांत समावेश असून, निवडणूक मतदान अधिकारी एन.एम. कासार, गटसचिव सुनीलकुमार इंगळे, प्र.ई. खंडागळे, के.एस. दळे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली. मतदानासाठी पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.याप्रसंगी विजयी उमेदवारांचा गावकर्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल हजारे, बबन ठेंगे, विष्णू राऊत, पप्पू पठाडे, नारायण बुरंगुळे, दीपक हजारे, दिनकर गव्हाणे, शहाजी झिणे, हरिभाऊ सातपुते, भीमराव आठे, परमेश्वर ठाणगे, ज्ञानेश्वर जाधव, अशोक नजन आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.