इंदूर : गावाच्या हद्दीत माकडाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे गावावर अरिष्ट ओढवेल आणि ते ओढवू नये म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील दकाचया गावात या माकडावर हिंदू रीतीरिवाजाप्रमाणो अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे 200 तरुणांनी मुंडणही केले. दीड लाख रुपये खचरून या माकडाच्या तेरवीचे जेवणही करण्यात आले.
इंदूरपासून 2क् कि.मी. अंतरावर हे गाव आहे. 2 सप्टेंबरला माकड आणि माकडीण गावात आले. काही कुत्र्यांनी या माकडांना खिजवले. याचदरम्यान माकड पाण्याने भरलेल्या मोठय़ा खड्डय़ात पडले आणि तेथे बुडून त्याचा मृत्यू झाला.
वानर हा भगवान हनुमानाचा अवतार मानला जातो. त्याचा मृत्यू अशुभ मानला जातो. त्याचमुळे गावक:यांनी या माकडाचे विधिवत अंत्यसंस्कार करायचे ठरवले. (वृत्तसंस्था)
च्3 सप्टेंबरला माकडाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या खेडय़ातीलही सहा हजार लोकांच्या उपस्थितीत या माकडावर हिंदू रीतीरिवाजाप्रमाणो अंत्यसंस्कार करण्यात आले.
च्2क्क् तरुणांनी मुंडण केले. यानंतर गाववर्गणीतून गत रविवारी तेरवीचा कार्यक्रमही पार पडला.