आव्हाणे येथे विवाहितेचा विनयभंग
By admin | Updated: April 28, 2016 00:31 IST
जळगाव: तालुक्यातील आव्हाणे येथे २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी लक्ष्मण रघुनाथ पाटील याच्याविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता लक्ष्मणने विवाहितेच्या घरी जाऊन अश्लील कृत्य केले होते.
आव्हाणे येथे विवाहितेचा विनयभंग
जळगाव: तालुक्यातील आव्हाणे येथे २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी लक्ष्मण रघुनाथ पाटील याच्याविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता लक्ष्मणने विवाहितेच्या घरी जाऊन अश्लील कृत्य केले होते.चोरी सोने घेणार्या व्यापार्यास अटकजळगाव: चोरीच्या सोनसाखळी खरेदी करणारा हरिप्रकाश रमेशचंद्र अग्रवाल (रा.भुसावळ) याला बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. १९ एप्रिल २०१४ रोजी नंदनवन कॉलनीतील प्रतिभा पांडुरंग राणे (वय ६२) या महिलेच्या गळ्यातून ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविण्यात आली होती. त्यात जावेद हुसेन जाकीर हुसेन व सादीक अली सैयद अली (दोन्ही रा.भुसावळ) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांनी ही सोनसाखळी अग्रवाल यांच्या दुकानात विक्री केली होती, त्यामुळे पोलिसांनी त्यालाही आरोपी केले होते. गुन्हा उघडकीस आल्यापासून अग्रवाल फरार होता.