मोहपा... श्रद्धांजली
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
मोहपा
मोहपा... श्रद्धांजली
मोहपास्थानिक गांधी चौक येथे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करीत आबांना श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शमसुद्दीन युसूफ शेख होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सोपीनाथ चांदेकर, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष बशीर पटेल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. सागर कऊटकर, आपचे बन्शीधर कोठीकर, शिवसेनेचे विजय वानखेडे, बापूसाहेब हळदे, जानराव गौरखेडे, श्रीकांत येनूरकर, रमेश चर्जन, इमेश्वर यावलकर, राजेश देशमुख, भैया नारनवरे, राशीद शेख, नगरसेविका ललिता आनडे, रायुकाँचे आशिष महाजन आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. (वार्ताहर)