हरीश गुप्ता - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनचा दौरा करणार असल्याचे वृत्त काही इंग्रजी दैनिकांनी प्रकाशित केलेले असले तरी ही चर्चा निव्वळ तर्कावर आधारित असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. याबाबत अधिकृत घोषणा होईर्पयत प्रतीक्षा करा, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला.
ओबामा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यास मोदी हे दोन दिवसांच्या वॉशिंग्टन भेटीवर जाणार असल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रलय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अथवा परराष्ट्र धोरण सल्लागार यापैकी कुणीही अद्याप दुजोरा दिलेला नाही. सामान्यपणो पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कला भेट देतात आणि 22सोबतच द्विपक्षीय चर्चेसाठी वॉशिंग्टनचाही प्रवास करतात. मोदींच्या अमेरिका दौ:यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केल्यास त्याचा दोन्हीकडे परिणाम होईल. त्यामुळे या वृत्तावर भाष्य करणो शहाणपणाचे ठरणार नाही, असे पीएमओ कार्यालयाच्या सूत्रंनी ‘लोकमत’ला सांगितले.