शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

मोदींच्या ट्विटचा लालूंनी घेतला समाचार!

By admin | Updated: March 11, 2017 21:53 IST

लालूप्रसाद यादव आणि सुशीलकुमार मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - राष्ट्रीय राजकारणात लालूप्रसाद यांची प्रचंड लोकप्रियता आहे. चारा घोटाळ्यामुळे जेलची हवा खाऊन आलेले लालूप्रसाद मिश्किल टीका-टिपणी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही लालूंच्या राष्ट्रीय जनता दलानं जनता दल युनायटेडशी युती करत बिहारमध्ये मोठा विजय मिळवला होता. मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये मोदी लाटेत विरोधक वाहून गेल्यानं लालूंचीही तोफ धडाडली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लालूप्रसाद यादव यांना खोचक सवाल विचारला, त्याला लालूप्रसाद यादवांनी हटके स्टाइलनं उत्तर दिलं आहे. सुशीलकुमार मोदींनी लालूप्रसाद यादवांना ट्विट करून विचारलं की, क्या हाल है ?, त्यानंतर लागलीच लालूप्रसाद यादव यांनी रिट्विट करत मोदींच्या ट्विटला कोट करून चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ठीक बा । देखा ना, बीजेपी ने तुम्हें यूपी में नहीं घुसने दिया तो फायदा हुआ।, असं म्हणत सुशीलकुमार मोदींवरच निशाणा साधला. मात्र दोघांचं हे ट्विटर वॉर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवर हे ब-याच जणांनी रिट्विट केलं आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव आणि सुशीलकुमार मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही लालू यादव यांनी मोदींवर अनेक वेळा टीका केली होती. एकदा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतला असून आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू, अशा तिखट शब्दांत त्यांनी मोदींवर हल्ला चढवला होता. (नरेंद्र मोदी हे कलयुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव)(नरेंद्र मोदी बनलेत'NRI, त्यांना बनवा 'जगाचे पंतप्रधान' - लालूप्रसाद यादव)

चारा घोटाळा करून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच्या चारा घोटाळ्याच्या एका प्रकरणात सीबीआयच्या दुसऱ्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद व अन्य आरोपींना चाईबासाप्रकरणी २०१४मध्ये शिक्षा ठोठावली होती, तूर्तास ते जामिनावर आहेत.