शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची ‘मौन’ की बात !

By admin | Updated: June 29, 2015 03:40 IST

नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ त्यात ते जे बोलले त्याहूनही जे बोलले नाहीत त्यावरून अधिक लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली.

नवी दिल्ली/हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘आकाशवाणी’वरील त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे देशवासीयांशी थेट संवाद साधला. पण मोदींची ही ‘मन की बात’ त्यात ते जे बोलले त्याहूनही जे बोलले नाहीत त्यावरून अधिक लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली. २० मिनिटांच्या या कार्यक्रमात मोदी योगापासून ते मुलींच्या घटत्या जन्मदराबद्दल तळमळीने बोलले. पण ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना मदत केल्यावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्याभोवती घोंघावणाऱ्या वादळावर पंतप्रधानांनी एका शब्दानेही भाष्य न केल्याने त्यांचे मौन शब्दांहूनही अधिक बोलके ठरले. साहजिकच आधीपासून हा मुद्दा लावून धरलेल्या विरोधकांना टीकेला नवा विषय आणि नवा जोर मिळाला. पंतप्रधानांच्या या मौनावर काँग्रेसने जोरदार हल्ला केला. आयपीएल घोटाळ्यातील आरोपी असलेल्या ललित मोदींना पंतप्रधान मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी केला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनीही मोदींवर तोफ डागली.पंतप्रधानांना थेट लक्ष्य करताना दिग्विजयसिंग म्हणाले की, पंतप्रधानांनी ‘मन की बात’ केली. मात्र गत पंधरवड्यापासून ललित मोदी प्रकरणातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे देणे त्यांनी टाळले. ललित मोदींना पंतप्रधान मदत करीत आहे, हा माझा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने चालविलेल्या चौकशीच्या कचाट्यातून सहीसलामत सुटका करण्याचे आश्वासन त्यांनी ललित मोदींना दिले आहे. काँग्रेसने हे प्रकरण लावून धरले आहे. पण भाजपाकडे आमच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही, असा ठपका दिग्विजय यांनी ठेवला. पंतप्रधानांना मीडियाच्या प्रकाशझोतात राहणे आवडते. म्हणून ते प्रत्येक मुद्यावर टष्ट्वीट करतात पण महत्त्वाचे मुद्दे मात्र जाणीवपूर्वक टाळतात, असा टोलाही त्यांनी लगावला.