शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोदींचे ‘मिशन मंत्रिमंडळ’ २३ पासून

By admin | Updated: May 22, 2014 02:39 IST

पाच दिवसांनंतर होणार्‍या शपथविधीमध्ये कोणाची वर्णी लागणार हे नरेंद्र मोदी यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे.

गजानन जानभोर, नवी दिल्ली - पाच दिवसांनंतर होणार्‍या शपथविधीमध्ये कोणाची वर्णी लागणार हे नरेंद्र मोदी यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. अजून कोणाशीही त्यांनी याबाबत चर्चा केलेलीे नाही; पण ते २३ मेपासून ‘मिशन मंत्रिमंडळ’ सुरू करणार आहेत. मोदींच्या मनात काय आहे हे भल्याभल्यांना कळत नाही, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळेच भाजपा आणि मित्र पक्षांमधून मंत्रिपद नेमके कोणाला मिळणार या विषयी अद्याप केवळ तर्कवितर्कच लढविले जात आहेत. वजनदार नेत्यांची नावे संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत टाकून ती वॉटस्अ‍ॅपवर टाकणार्‍या उत्साही जनांची संख्याही कमी नाही. मोदी एक एक पायरी चढून जात आहेत. एकावेळी सर्व विषयांना त्यांनी मुद्दामच हात घातला नाही. स्वत:ची भाजपा सांसदीय मंडळाच्या नेतेपदी निवड होईपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळाचा विषयच कुठे छेडला नाही. दोन दिवस ते गुजरातमध्ये व्यस्त आहेत आणि तेथून परतल्यानंतर २३ तारखेपासून मंत्रिमंडळ रचनेबाबत भाजपाचे नेते आणि एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू करणार आहेत. राज्यमंत्र्यांची बनतेय यादी पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर, संघटन सरचिटणीस रामलाल आणि सरचिटणीस जगतकुमार नढ्ढा व अनंतकुमार हे पक्षातर्फे प्रत्येक राज्यातील प्रमुख पाच ते दहा प्रमुख खासदारांचे प्रोफाईल तयार करीत आहेत. २३ तारखेला ते मोदी यांना दिले जातील. राज्यमंत्री निवडण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबिली जात आहे. अर्थातच अंतिम निर्णय कोअर कमिटीचा आणि मोदींचा असेल. त्यांच्यासमोर डाटा तयार असावा म्हणून प्रोफाईल तयार केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात या यादीचा उपयोग मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी होणार आहे. नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथसिंह, वेंकय्या नायडू, गोपीनाथ मुंडे, डॉ.मुरली मनोहर जोशी, श्रीपाद नाईक, सुमित्रा महाजन, रामविलास पासवान, डॉ.हर्षवर्धन, अनंतकुमार,बंडारू दत्तात्रय, मुख्तार अब्बास नकवी, शाहनवाज हुसेन अशा मोठ्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्याचा आधार घेऊन दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ याद्यांचे पेव फुटले आहे.