नवी दिल्ली- भारत आणि अमेरिकेदरम्यान सुदृढ होत चाललेल्या संबंधांची प्रचिती देत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा २७ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात सहभागी होऊन देशाला संबोधित करणार आहेत.दर महिन्याला रेडिओवर प्रसारित होणारा पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम यावेळी खास असणार आहे. कारण प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे असलेले ओबामा हे सुद्धा त्यात सहभागी होणार आहेत, अशी घोषणा खुद्द पंतप्रधानांची गुरुवारी सकाळी टिष्ट्वटरवर केली. जनतेला प्रश्न पाठविण्याचे आवाहन करतानाच लोकांच्या सहभागाशिवाय ओबामांसह मन की बात पूर्ण होऊ शकणार नाही, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. जनता आपले प्रश्न येत्या २५ तारखेपर्यंत ‘आस्क ओबामा मोदी’ या माध्यमाने पाठवू शकेल. याशिवाय ‘मायजीओव्ही’ वेबसाईटवरही प्रश्न पाठविता येतील. ओबामा आणि मोदींना प्रश्न विचारा आणि जगापुढे भारत-अमेरिका संबंधांचे चित्र सादर करणारा हा कार्यक्रम स्मरणीय बनवा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मोदींची ‘मन की बात’ रंगणार ओबामांच्या संगे
By admin | Updated: January 23, 2015 01:46 IST